डिचोलीतील सेझा ट्रकमालक संघटनेकडून दोन देवस्थानांना आर्थिक सहाय्य

प्रतिनिधी
सोमवार, 7 सप्टेंबर 2020

डिचोलीतील सेझा खाणीवर खनिज वाहतूक करणाऱ्या ट्रकमालकांच्या संघटनेकडून मयेतील दोन मंदिर बांधकामांसाठी आर्थिक मदत देण्यात आली आहे.

डिचोली: डिचोलीतील सेझा खाणीवर खनिज वाहतूक करणाऱ्या ट्रकमालकांच्या संघटनेकडून मयेतील दोन मंदिर बांधकामांसाठी आर्थिक मदत देण्यात आली आहे. जिर्णोध्दाराचे काम चालू असलेल्या केळबाय वाड्यावरील श्री केळबाई आणि मये तलावाकडील श्री तळेश्वर या दोन्ही देवस्थानांना प्रत्येकी दिड लाख याप्रमाणे ३ लाख रुपये आर्थिक मदत देण्यात आली आहे. 

शनिवारी दोन्ही देवस्थानात आयोजित कार्यक्रमात ट्रक मालक संघटनेचे अध्यक्ष तथा डिचोलीचे नगराध्यक्ष सतीश गावकर यांच्या हस्ते आर्थिक मदतीचे धनादेश वितरीत करण्यात आले. यावेळी संघटनेचे सचिव सुभाष किनळकर, खजिनदार गुरुदास कोरगावकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. केळबाई मंदिरात आयोजित कार्यक्रमात जिर्णोध्दार समितीचे अध्यक्ष नितीन गाड्‌डी यांच्याकडे दिड लाख रुपये आर्थिक मदतीचा धनादेश देण्यात आला. यावेळी उपाध्यक्ष रघुनाथ नाईक, सचिव अशोक गावस, खजिनदार दादू नाईक आदी ग्रामस्थ उपस्थित होते. देवदेवतांच्या आशीर्वादामुळेच देवस्थानांना आर्थिक मदत देणे ट्रकमालकांना शक्‍य झाले, असे यावेळी सतीश गावकर यांनी सांगून देवदेवतांच्या कृपेने बंद असलेल्या खाण व्यवसायाला निश्‍चितच चालना मिळून खाणपट्ट्यातील जनतेवरील आर्थिक संकट दूर होणार, असा अशावाद व्यक्‍त केला. सुभाष किनळकर यांनी स्वागत करून दवस्थानांना आर्थिक मदत देण्यामागचा हेतू स्पष्ट केला. तत्पूर्वी श्री तळेश्वर मंदिरात पार पडलेल्या कार्यक्रमात देवस्थान समितीकडे आर्थिक मदतीचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. यावेळी निलेश मांद्रेकर, महादेव केरकर, सुमित तळवणेकर, गंगाराम शिरोडकर, दिपक किनळकर, विश्वजित घाडी आदी ग्रमास्थ उपस्थित होते. 

संबंधित बातम्या