काणकोणात ४ लाख १९ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल

काणकोणात ४ लाख १९ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल
काणकोणात ४ लाख १९ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल

काणकोण, 

‘टाळेबंदी’ लागू असताना वेगवेगळ्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांविरुद्ध काणकोण पोलिसांनी कारवाई केली. कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी नागरिकांकडून ४ लाख १९ हजार ४०० रुपये दंडाच्या रुपाने वसूल केले. २५ मार्चपासून या कारवाईला सुरूवात झाली होती.
टाळेबंदी काळात ३९५६ वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल करण्यात आले. वाहतूक कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी २७०७ नागरिकांविरुद्ध दंडात्मक कारवाई करून ३ लाख रूपये वसूल करण्यात आले. ५४३ नागरिकांविरुद्ध मास्क न घातल्याबद्धल कारवाई करण्यात आली. २७४ नागरिकांविरुद्ध सार्वजनिक जागेत थुंकल्याप्रकरणी व २६७ नागरिकांविरुद्ध उघड्यावर कचरा टाकल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. साथीचा रोग कायदा मोडल्याप्रकरणी ६० व्यक्तींना ताब्यात घेण्याबरोबरच १९ वाहने जप्त करण्यात आली. 

 

 

 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com