चोरीप्रकरणी कोलवाळच्या माजी सरपंचाविरोधात एफआयआर दाखल

कोलवाळ पंचायतीच्या मालकीचे सुमारे साठ हजार मूल्याचे लॅपटॉप संगणक चोरून पंचायतीची फसवणूक
चोरीप्रकरणी कोलवाळच्या माजी सरपंचाविरोधात एफआयआर दाखल
FIR filed against former sarpanch of Colvale Dainik Gomantak

म्हापसा: कोलवाळ (Colvale) पंचायतीच्या मालकीचे सुमारे साठ हजार मूल्याचे लॅपटॉप संगणक चोरून पंचायतीची फसवणूक केल्याप्रकरणी पंचायत सचिव प्रेमानंद मांद्रेकर माजी सरपंच बाबनी साळगावकर यांच्या विरोधात कोलवाळ पोलिसात तक्रार सादर केली असून, या प्रकरणी पोलिसांनी एफआयआर नोंदवला आहे.

FIR filed against former sarpanch of Colvale
Goa: अचारसंहितेपूर्वीच सर्व सरकारी रिक्त पदे भरणार

चौदाव्या वित्त आयोगाच्या निधींतर्गत हा संगणक 26 फेब्रुवारी 2021 रोजी निविदा जारी करून सिद्धेश साळकर या डीलरकडून विकत घेतला होता व तो संगणक तत्कालीन सरपंच बाबनी साळगावकर यांच्याकडे दिला होता असे स्पष्टीकरण डीलरने केले असल्याच दावा तक्रारीत करण्यात आला आहे. तथापि, तो संगणक पंचायत कार्यालयात आजपावेतो आलेलाच नाही, असेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणासंदर्भात बोलताना विद्यमान सरपंच नित्यानंद कांदोळकर म्हणाले, की साळगावकर यांनी सध्या पंचायत कार्यालयात माहिती हक्क अधिकाराखाली या संगणक प्रकरणी विस्तृत माहिती मागवली आहे; परंतु, स्वत:च्याच सरपंचपदाच्या कारकिर्दीत व त्यांच्याच पुढाकाराने विकत घेतलेल्या ऐवजाबाबत अशा पद्धतीने माहिती मागवणे हास्यास्पद आहे. पंचायत मंडळाने 28 रोजी संमत केलेल्या ठरावानुसार ही पोलिस तक्रार सादर करण्यात आल्याचेही ते म्हणाले.

राजकीय हेतूनेच व माझा वचपा काढण्यासाठीच राजकीय विरोधकांनी माझ्याविरोधात पोलिसांत तक्रार दिलेली आहे. संगणक विकत घेण्याची ही घटना सुमारे सहा महिन्यांपूर्वी घडलेली आहे. संगणक चोरीची ती कृती माझ्याकडून घडलेली होती तर एवढे दिवस तक्रार का म्हणून सादर करण्यात आली नाही?

- बाबनी साळगावकर, माजी सरपंच, कोलवाळ.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com