बोगस भूखंड विक्रीप्रकरणी जीत आरोलकरांविरूद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 16 नोव्हेंबर 2020

जीत आरोलकर यांच्याविरुद्ध आर्थिक गुन्हे कक्षाच्या पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. सुमारे एक लाखाहून अधिक चौ. मी. जागेत भूखंड करून ते विकण्यात आले आहेत.

पणजी - पॉवर ऑफ अॅटर्नीचा गैरवापर व बोगस भूखंड विक्री खत करून पेडणे येथील भूखंडांची विक्री केल्याप्रकरणी जीत आरोलकर यांच्याविरुद्ध आर्थिक गुन्हे कक्षाच्या पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. सुमारे एक लाखाहून अधिक चौ. मी. जागेत भूखंड करून ते विकण्यात आले आहेत. सुमारे २५ ते ३० कोटींचा हा घाटोळा असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

 गेल्या महिन्यात ही तक्रार दाखल झाली होती. पेडणे पोलिसांनी प्राथमिक चौकशीअंती त्यात मालमत्तेचा समावेश असल्याने ती आर्थिक गुन्हे कक्षाकडे सुपूर्द केली आहे. याप्रकरणी पोलिस निरीक्षक प्रवीण वस्त चौकशी करत आहेत.

संबंधित बातम्या