गोव्यात 16 कोटींचा घोटाळा; रंगीता एंटरप्रायजेसवर अखेर गुन्हा दाखल

एकूण घोटाळ्यापैकी गोव्यातील ग्राहकांची 9.33 कोटी रुपयांची फसवणूक
Fraud in Goa | Ranggeeta Enterprises Scam in Goa
Fraud in Goa | Ranggeeta Enterprises Scam in GoaDainik Gomantak

मडगाव : गोव्यातील अनेक ग्राहकांना गंडा घातलेल्या रंगीता एन्टरप्रायजेस या आस्थापनाविरुद्ध अखेर तक्रार दाखल करण्यात आली आहे. या आस्थापनाने 2 हजार ग्राहकांना एकंदरीत 16 कोटी रुपयांचा गंडा घातल्याची माहिती आहे. यातील 9.33 कोटी रुपये गोव्यातील ग्राहकांचे पैसे आहेत. आर्थिक गुन्हा शाखेचे विभागीय पोलीस निरीक्षक विदेश शिरोडकर यांनी हे प्रकरण नोंद करून घेतले आहे.(Ranggeeta Enterprises Scam in Goa)

सध्या नावेली येथे राहत असलेले मूळ वडोदरा गुजरात येथील गोहिल जयकुमार, आगोंद येथील स्वीझल फर्नांडिस, मडगावमधील मुईद माधवानी, वास्को येथील लमाजी लमाणी, मडगाव पाजिफोंड येथील मरीन माधवानी, वडोदरा गुजरात येथील आरती कश्यप हे या प्रकरणातील संशयित आरोपी आहेत. या संशयितांवर विविध कलमांखाली तसेच प्राईस चिट अँड मनी सर्कुलेशन स्कीम (बर्निंग ) अॅक्टच्या 4 आणि 5 कलमाखाली गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Fraud in Goa | Ranggeeta Enterprises Scam in Goa
नगरनियोजन खात्यासंदर्भात पुराव्यासह तक्रारी द्या : विश्वजीत राणे

या संशयित आरोपींनी जुलै 2021 ते जून 2022 दरम्यान गोव्यातील गुंतवणूकदारांकडून 9.33 कोटी रुपये घेत त्यांना गंडा घातला आहे. रंगीता एन्टरप्रायजेस च्या नावाखाली संशयित आरोपींनी दर आठवड्याला 20 टक्के व्याज देण्याचा दावा केला होता. गोव्यातील गुणवंतुकदारांकडून आरोपींनी पैसे घेतले होते. यात किमान 1 लाख रुपये गुंतवणाऱ्याला 80 हजार रुपये देण्याचे आमिष दिले गेले होते. याला बळी पडून गोव्यातील अनेक ग्राहकांनी आपले पैसे गुंतवले होते.

6 ते 7 महिने या कंपनीने ग्राहकाकडून पैसे घेतल्यानंतर वेळोवेळी ग्राहकांना व्याजाची रक्कम अदा केली आणि त्यानंतर गाशा गुंडाळला. यातील काही संशयित आरोपींनी थोड्या कालावधीसाठी ग्राहकाशी संपर्क ठेवला आणि नंतर ते गायब झाले. आता या कंपनीने अनेक लोकांची फसवणूक केल्याचा दावा तक्रारीत केला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com