म्हापशात ‘बाटा’ शूजच्या गोदामास आग

40 लाख रुपयांचे नुकसान ः शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना घडल्याचा अंदाज
Fire at Bata Warehouse Mapusa
Fire at Bata Warehouse MapusaDainik Gomantak

म्हापसा : आंगड-म्हापसा येथील जामा मशिदीजवळील कोलवाळकर इमारतीमधील ‘बाटा’च्या शूज गोदामाला आग लागल्याने अंदाजे 40 लाखांचे नुकसान झाले. सदर घटना, रविवारी (19 जून) रात्री 8.15च्या सुमारास समोर आली. शॉट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

कोलवाळकर इमारतीच्या तळमजल्यावरील दुकानांमध्ये हा बाटा शूजचा गोदाम आहे. दुकानातून धूर येत असल्याचे इमारत मालकांच्या निदर्शनास आले. त्यांनी ताबडतोब सिरसाट इमारतीमधील बाटा दुकानाच्या कर्मचाऱ्यांना घटनास्थळी बोलावून घेतले.

कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन गोदामाचे शटर उघडले, तेव्हा आग लागून गोदाम धुराने भरला होता. शटर उघडल्यानंतर धुराचे लोट परिसरात पसरले. तात्काळ म्हापसा अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. दलाचे उपअधिकारी ज्ञानेश्वर सावंत हे सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल केले. त्यांनी पाण्याचा फवारा मारून आग विझवण्याचे कार्य सुरू केले.

Fire at Bata Warehouse Mapusa
काँग्रेस सरकारला घेरण्‍यास सज्ज ; विधानसभेत लोकांशी निगडित विषय मांडणार

यावेळी दुकानाचा वीजपुरवठा सुरू होता. त्यामुळे अग्निशमन दलाच्या जवानांच्या कामात अडथळा निर्माण झाला. अर्ध्या तासानंतर वीज कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी वीजपुरवठा खंडित केला. त्यानंतर दलाच्या जवानांनी आग विझवली. कागदी पेट्यामधील प्लास्टीक व चामड्यांच्या चप्पल आणि बुटांना आग लागल्यामुळे ही आग विझवणे कठिण बनले. पाण्याचा चार बंबाचा वापर करून दलाच्या जवानांनी दोन तासांनी आगीवर नियंत्रण मिळवत ती विझवली.

या घटनेची माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक विराज कोरगांवकर हे सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. तर हवालदार महेश शेटगांवकर यांनी पंचनामा केला.

नितीन शिरोडकर आणि मंत्रवादी यांनी हे दुकान भाड्याला घेऊन त्यात गोदाम थाटला होता. गोदामात सुमारे 40 ते 50 चप्पल तसेच बुटांच्या पेट्या होत्या. या सर्व पेट्यातील चप्पले आणि बूट जळून खाक झाले. सुमारे 40 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com