Fire In Goa: म्‍हादई खोऱ्यात अजूनही अग्‍नितांडव कायम

16 ठिकाणची आग नियंत्रणात आणल्‍याचा वन खात्याचा दावा
Fire in Goa
Fire in GoaFile Photo

Fire In Goa सत्तरीच्या साट्रे परिसरात लागलेली आग आता राज्यभर पसरली असून, वनखात्याच्या सात डोंगरमाथ्यांवर आगीचे तांडव कायम आहे. दुसरीकडे वनखाते नौदल आणि वायुदलाच्या आग आटोक्‍यात आणण्‍याच्‍या प्रयत्नांना काहीशी यश आले असून 16 ठिकाणची आग नियंत्रणात आणल्‍याचा वन खात्याचा दावा आहे. अग्‍नीआपत्ती नियंत्रणासाठी ग्रामस्‍थांचे साह्य घेतले जात आहे.

वनमंत्री विश्वजीत राणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, म्हादई, मोले, नेत्रावळी अभयारण्य, सरकारी जंगल, खाजगी वन, कोमुनिदाद जमीन अशा अनेक ठिकाणी आग लागली आहे. ती विझवण्यासाठी वन खाते, अग्निशमन आणि आपत्कालीन यंत्रणा, हवाई व नौदल आठवडाभर कार्यरत आहे. काल शनिवारी दिवसभरात वन खात्याला 16 ठिकाणची आग विझवण्यात यश आले आहे.

राज्यात वाढलेले तापमान आणि कमी झालेली आद्रता लक्षात घेऊन वनखात्याने नागरिकांनी काय करावे आणि काय करू नये, यासंबंधीची जिल्हाधिकाऱ्यांची सार्वजनिक नोटीस जारी केली आहे. विविध भाषेतील ही नोटीस गावांतील मुख्य वास्तू, सार्वजनिक स्थळे, दुकाने, आस्थापने आणि ग्रामस्थांनाही पत्रक स्वरूपात वाटण्यात येत आहे.

Fire in Goa
Goa Cricket Association: 'या' कारणास्तव ‘जीसीए’ मधून केतन भाटीकरांना हटवले

आग सिद्धाच्या राय डोंगरावर

कासारपालकडून साळला जाणाऱ्या रस्त्यावर मध्येच वडावल हे गाव लागते. येथे गोव्यातील सर्वांत जुने शिवलिंग आहे. त्या शिवलिंगाच्या डोंगरावर आग लागली आहे. ही आग साळ येथील डोंगरातून पसरत वडावलपर्यंत पोहोचली आहे. याकडे अद्याप वनखात्याचे लक्ष नसल्याचा नागरिकांचा दावा आहे. सांगितले असून काही ठिकाणी स्थानिक आग विझविण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com