Vasco: सतर्क राहा! आपत्कालिन परिस्थितीत कशी विझवाल आग? विद्यार्थ्यांनी घेतले प्रत्यक्ष धडे

आग विझविण्यासंदर्भातील विद्यार्थी व पालकांना काही प्रात्यक्षिके दाखवण्यात आली.
Vasco
VascoDainik Gomantak

आग दुर्घटना हा गंभीर प्रकार असल्याने त्यामुळे होणारी हानी टाळण्यासाठी प्रत्येकाने सुरक्षा उपाय जाणून घेणे महत्वाचे असल्याचे मत एम.पी.ए. अग्निशमन दलाचे प्रमुख ओमप्रकाश सरोज यानी व्यक्त केले.

जेटी सडा येथील श्री सूसेनाश्रम विद्यालयामध्ये आयोजित मॉर्क ड्रिलच्या वेळी उपस्थित विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांसमोर ते बोलत होते.

"आगीचे प्रकार वेगवेगळे असले तरी कुठल्याही प्रकारची आग लागली तर त्वरित उपाय करणे आवश्यक आहे. अन्यथा एखादी दुर्घटना होऊन मोठ्या प्रमाणात हानी होऊ शकते. आग लागल्यानंतर विचलित न होता शांतपणे आणि विचारपूर्वक त्यावर उपाय काढणे आवश्यक आहे त्यासाठी योग्य ती माहिती प्रत्येकाने जाणून घेणे व इतरांनाही त्याबद्दल जागृत करण्याची गरज आहे," असे ओमप्रकाश सरोज म्हणाले.

"स्वयंपाक घरात गॅस वापरताना महिलांनी सुरक्षितपणे त्याचा वापर करणे किंवा एखाद्या वेळी अनपेक्षित घटना घडली तर त्यावर उपाय जाणून घेण्याची गरज आहे," असे ते म्हणाले.

Vasco
Dr. Sudesh Dhankhar: उपराष्ट्रपती धनकर यांच्या पत्नीने बाणावली किनारी केले जेट-स्कीइंग, पाहा फोटो
Vasco
VascoDainik Gomantak

यावेळी आग विझविण्यासंदर्भातील विद्यार्थी व पालकांना काही प्रात्यक्षिके दाखवण्यात आली. पालक व विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची ओमप्रकाश याने समर्पक उत्तरे दिली.

शाळेच्या मुख्याध्यापिका सुनीता पवार यांनी उपस्थितांचे स्वागत करताना अशा पद्धतीची प्रात्यक्षिके प्रत्येक ठिकाणी आवश्यक असल्याचे सांगितले. यामुळे समाजामध्ये जागृती निर्माण होईल आणि मोठ्या प्रमाणात होणारी हानी टाळता येईल. पालक शिक्षक संघाच्या अध्यक्ष अनिता तांडेल व इतर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. शिक्षक संतोष खोर्जुवेकर यांनी आभार व्यक्त केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com