वास्कोत कोळसावाहू मालगाडीतून धुराचे लोट

अधिकाऱ्यांची उडाली तारांबळ; अग्निशमन दलाने प्रसंगावधान दाखवत विझवली आग
वास्कोत कोळसावाहू मालगाडीतून धुराचे लोट
fire in coal wagon

वास्को : कोळसावाहू मालगाडीमधील एका रॅकमधून निघणाऱ्या धुरामुळे वास्कोत रेल्वे अधिकाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. ही घटना काल गुरुवारी सकाळी 11 वाजता बायणा - वास्को येथे घडली. गेल्या आठवडाभरातील अशाप्रकारची ही दुसरी घटना आहे. अग्निशमन दलाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला आहे.

fire in coal wagon
उमेदवारांना दिलासा, अखेर सरकारी नोकर भरती सुरू

एमपीएमधून काल गुरुवारी सकाळी कोळसा भरून मालगाडी बाहेर येताना काही डब्यांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त कोळसा भरलेला लक्षात आला. रेल्वे अधिकाऱ्यांना याची माहिती मिळताच त्यांनी कोळसावाहू मालगाडी बायणा येथे रेल्वे सेडींगमध्ये उभी केली. त्यावेळी मालगाडीच्या एका डब्यातून धूर येत असल्याचं एका कामगाराच्या नजरेस आलं. त्यांनी याविषयी रेल्वे अधिकाऱ्यांना माहिती देताच रेल्वे अधिकाऱ्यांनी वास्को अग्निशमन दलाला पाचारण केले.

fire in coal wagon
गोव्यातील अनाथाश्रमात 20 वर्षीय मुलाने उचलले टोकाचे पाऊल

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी धावून आले आणि त्यांनी कोळशाचा डबा उघडून कोळसा बाहेर काढला. त्याच्यावर पाण्याचा फवारा मारला. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. अन्यथा कोळशाने पेट घेतला असता आणि मोठी दुर्घटना घडली असती.

दोन दिवसांपूर्वी अशीच घटना घडली असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. यानंतर ओव्हरलोड झालेल्या रेकमधून कोळसा कमी करण्यात आला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.