हळदोणा येथे फ्लॅटला आग; लाखोंचं नुकसान

शॉर्ट सर्किटमुळे सदर आग लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Fire in Mapusa
Fire in MapusaDainik Gomantak

योगेश मिराशी

म्हापसा : हळदोणा येथील सेंट थॉमस शाळेनजीक असलेल्या ‘आदित्य रेसिडेन्सी’मधील एका फ्लॅटला आग लागल्याने अंदाजे पाच लाख रुपयांचे नुकसान झाले. दुर्घटनेत सुदैवाने जीवितहानी टळली. शॉर्ट सर्किटमुळे सदर आग लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सदर दुर्घटना शुक्रवारी (29 जुलै) घडली असून, म्हापसा अग्निशमन दलास याबाबत सायंकाळी 6 वाजून 3 मिनिटांनी कॉल आला. मार्टिन लोबो असे फ्लॅट मालकाचे नाव आहे.

फ्लॅट मालक यांनी सांगितले की, या आगीत फ्लॅटमधील दोन खोल्या पूर्णतः जळून खाक झाल्या. यात इलेक्ट्रॉनिक उपकरणे तसेच इतर साहित्य जळाले. ज्यामध्ये संगणक, एसी, लॅपटॉप, प्रिंटर, पलंग, दोन लोखंडी कपाट, दागिने आदी वस्तूंचा समावेश आहे. आपले अंदाजित पाच लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा त्यांनी केला आहे.

Fire in Mapusa
झुआरी अपघातामागे हलगर्जीपणा की बेसावधपणा?

दरम्यान, म्हापसा अग्निशमन दलाचे उप अधिकारी प्रेमानंद अनंत कांबळी, फायर फायटर सुरज शेटगांवकर, चालक प्रेमानंद विठ्ठोबा कांबळी, साईराज नाईक, विष्णू केसरकर यांनी घटनास्थळी धाव घेत या आगीवर नियंत्रण मिळविले. अग्निशमन दलाने या आगीत अंदाजे दोन लाख रुपये नुकसान झाल्याचे म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com