Sanguem Fire: सांगेत आगीच्या घटना सुरूच; 'आयआयटी' डोंगर पेटू लागला...

सांगेत चार दिवसांपुर्वीच चार ठिकाणी लागलेली आग
Fire in Goa File Photo
Fire in Goa File PhotoDainik Gomantak

Sanguem Fire: सांगे भागातील आगलावेपणा अजून थांबत नसून चार दिवसांपूर्वी सांगेत एकाच दिवशी चार ठिकाणी आग लागून मालमत्तेची हानी झाल्याची नोंद झाली असताना आज, संध्याकाळी अचानक आयआयटी डोंगरावर आग लागल्याचे दिसून आले आहे.

Fire in Goa File Photo
Sanguem IIT: सांगेत 'आयआयटी'साठी नव्याने 3 जागा सुचविल्या; केंद्रीय समिती करणार पाहणी

जिथे आयआयटी साकारणार होती त्या डोंगराच्या पायथ्याशी काही शेतकऱ्यांनी काजू लागवड केली आहे.

त्या खाली शेती बागायती निर्माण केल्या असल्या तरी डोंगरावर काहीही नसताना आगलावेपणा करून केरी पाठोपाठ आता सांगेतही डोंगर पेटू लागल्याने सांगेत हा विषय चर्चेचा बनला आहे. आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अस्पष्ट आहे

चार दिवसापूर्वी भाटी सांगे येथील संगुण गावकर, कृष्णा वेळीप, आंनद भाटिकार, चंदा गावकर यांच्या मळ्यांना आग लागून लहान पोफळी, काजू, कवाथे, केळी जळून खाक झाली होती. भर उन्हात आग लागत असल्यामुळे सहजरित्या आग आटोक्यात आणणे अशक्य बनले आहे.

Fire in Goa File Photo
Goa Temperature: गोवा तापणार! 10 मार्चपर्यंत कमाल तापमानात 4 ते 5 अंशांची वाढ होण्याची शक्यता

त्यात जवळपास आग लागल्यास गावकरी धावतात पण नजरे आड असणाऱ्या मळ्यांना आग लागल्यास ती विजविण्यासाठी जाईपर्यंत सर्व काही जळून खाक झालेले असते.

अशा घटना घडून शेतकऱ्यांना होणाऱ्या नुकसानीचा आर्थिक फटका सहन करावा लागत असून शासनाकडून धावपळ केला जाणाऱ्या खर्चाइतकी रक्कम सुद्धा मिळत नसल्याने शेतकरी नाराजी व्यक्त करतात.

घामा कष्टातून उभी केलेली पिके एका क्षणात राख होऊन जात असल्यामुळे नागरिकात तीव्र संताप व्यक्त केला जात असून शासनाने आगी लावणाऱ्यांविरोधात कडक उपाय योजना करण्याची मागणी लकमू गावकर यांनी केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com