म्हापसा, करासवाडा येथे हवेत गोळीबार

परस्परविरोधी तक्रारीनंतर गोळीबार करणाऱ्या संशयिताला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
Mapusa Firing
Mapusa FiringDainik Gomantak

म्हापसा : म्हापसा परिसरातील करासवाडा येथे अरुंद सर्व्हिस रस्त्यावर बाजू देताना कारचे चाक दुचाकीस्वाराच्या पायावरून गेल्याने दोन्ही वाहनचालकांत वादावादी झाली. याच वादावादीचे रुपांतर मारामारीमध्ये होऊन हवेत गोळीबारही झाला. या प्रकरणी म्हापसा पोलिसांनी परस्परविरोधी गुन्हा नोंद केल्यानंतर संशयित योगेश पाडलोस्करला अटक केली. (Mapusa Firing News Update)

Mapusa Firing
काँग्रेसकडून उमेदवारांची चौथी यादीही जाहीर

मंगळवारी सकाळी करासवाडा, थिवी परिसरात हा गोळीबारीचा (Firing) थरार पाहायला मिळाला. आरोपी पाडलोस्कर मंगळवारी सकाळी हे कुटुंबीयांसमवेत कारमधून जात होते. यावेळी समोरुन दुचाकीवर येणाऱ्या आरीफ लंगोटी याच्या पायावर कारचे चाक गेले. यानंतर पाडलोस्कर आणि आरीफ यांच्यात धक्काबुक्की झाली. म्हापसा (Mapusa) परिसरात झालेला हा वाद एवढा विकोपाला गेला की धक्काबुक्कीचे रुपांतर गोळीबारापर्यंत गेलं.

Mapusa Firing
Viral Video : 15 वर्ष मत दिलं, तुम्ही काय केलं; भाजप आमदाराला मतदाराचा सवाल

संशयित योगेश पाडलोस्कर यांनी आरीफला धमकावण्यासाठी आपल्या जवळील पिस्तूल काढले आणि हवेत गोळी झाडली. यावेळी झालेल्या झटापटीत आरीफ याच्या डोक्याला दगड लागला. तसेच हाताला दुखापत होऊन तो जखमी झाला. तर पाडलोस्कर यांनाही मारहाण झाली. परस्परविरोधी तक्रारीवरून योगेश पाडलोस्कर, भाग्यश्री पाडलोस्कर, यश पाडलोस्कर यांच्या विरोधात आणि आरीफ गुडूसाब लंगोटी याच्यावर गुन्हा नोंद झाला. पोलिसांनी एकाला अटकही (Arrest) केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com