कोरोनाची 'कोवीशिल्ड' लस गोव्यात पोहोचली

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 13 जानेवारी 2021

कोरोना प्रतिबंधात्मक लशीचं  आज गोव्यातवितरण झालं. लसींचे दोन बॉक्स हवाई मार्गाने आणून गोव्याच्या आरोग्य सेवा संचालनालयाच्या ताब्यात दिल्याची माहिती भारतीय विमानतळ प्राधिकरणाने ट्विट करून दिली आहे.

पणजी :  कोरोना प्रतिबंधात्मक लसीचं आज गोव्यात वितरण झालं. लशींचे दोन बॉक्स हवाई मार्गाने आणून गोव्याच्या आरोग्य सेवा संचालनालयाच्या ताब्यात दिल्याची माहिती भारतीय विमानतळ प्राधिकरणाने ट्विट करून दिली आहे.  गोव्यात लसीकरणाच्या दोन चाचण्या घेण्यात आल्या आहेत. तालुका पातळीवर उणे तापमानात लस साठवण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. सहा इस्पितळात हे लसीकरण केलं जाणार आहे.

सीरम इन्स्टिटय़ूटच्या 'कोवीशिल्ड' लसीला आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिल्यानंतर सीरम इन्स्टिटय़ूट पुणे या ठिकाणाहून अखेर वितरण करण्यास सुरुवात झाली आहे. 16 जानेवारीपासून देशभरात कोरोनाच्या लसीकरणाची मोहीम सुरु होणार आहे.

गोव्यात लसीकरणाच्या पहिल्या फेरीत अंदाजे १९,००० आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार आहे. गोवा सरकारने लसीकरण मोहिमेच्या पहिल्या टप्प्यासाठी ६ रूग्णालयांमध्ये तयारी सुरू केली आहे. यामध्ये पाच सरकारी तर तीन खासगी रूग्णालयांचा समावेश असेल. सरकारी रूग्णालयांमध्ये यामध्ये गोवा वैद्यकिय महाविद्यालय, उत्तर व दक्षिण गोव्यतील दोन्ही जिल्हा रुग्णालयांचा समावेश असेल, तर तीन खाजगी - मणिपाल हॉस्पिटल, व्हिक्टर अपोलो हॉस्पिटल आणि हेल्थवे हॉस्पिटल या रूग्णालयांमध्ये पहिल्या टप्प्यातील लसीकरण मोहिम पार पडणार आहे. 

संबंधित बातम्या