पिळर्णमध्ये पहिला कोरोना रुग्ण सापडला

पिळर्णमध्ये पहिला कोरोना रुग्ण सापडला
corona

शिवोली

डॉक्टरी पेशातील ही महिला रुग्ण फोंडा येथील सरकारी आरोग्य इस्पितळात कोविड स्वॅबचे नमुने जमा करण्याचे काम करीत होत्या. स्वॅब चाचणीवेळी त्यांचा कोरोना रुग्णाशी संबंध आल्याने त्यांना कोरोना महामारीचा संसर्ग झाला असण्याची शक्यता पिळर्ण पंचायतीचे सरपंच सतीश बांदोडकर यांनी व्यक्त केली आहे.
संबंधित महिला डॉक्टरचे पिळर्ण वास्तव्य असून दोन दिवसांपूर्वीच त्या पिळर्ण येथे आल्या होत्या. यावेळी इतरांमध्ये जास्त मिसळणे त्यांनी टाळले होते. पुढील उपचारासाठी त्यांना मडगावच्या कोविड उपचार केंद्रात दाखल करण्यात येणार आहे.
दरम्यान, या घटनेची दखल घेत पर्वरी पोलिसांकडून पिळर्ण पंचायत क्षेत्रातील पीडीए कॉलनी ‘सील’ करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

संपादन - यशवंत पाटील

Related Stories

No stories found.