आज ‘विधिकार दिन’..‘भाषक वादा’ची ठिणगी आजही

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 9 जानेवारी 2021

विधिकारदिनाच्या कार्यक्रमासाठी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू हे आज उपस्थित राहणार आहेत.

पणजी : विधिकारदिनाच्या कार्यक्रमासाठी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू हे आज उपस्थित राहणार आहेत. ९ जानेवारी १९६४ रोजी पहिली विधानसभा भरली होती. त्यामुळे तो दिवस ‘विधिकार दिन’ (लेजिस्लेटर डे) म्हणून दरवर्षी साजरा केला जातो. पहिली विधानसभा ते आज यातील एक गोष्ट कायम राहिली ती म्हणजे ‘भाषक वाद’. विधानसभेच्या पहिल्याच दिवशी ‘भाषक वादा’वरून ठिणगी पडली होती ती आजवर या ना त्या रुपात धगधगत राहिली आहे.

विधानसभेतील हयात सदस्‍यांचा गौरव

विधानसभा संकुलाच्या मागील बाजूस असलेल्या हिरवळीवर उद्या दुपारी चार वाजता विधिकार दिनाचा यंदाचा कार्यक्रम होणार आहे. दरवर्षी तो सार्वजनिक लोकलेखा समितीच्या सभागृहात होत असे. यंदा गोवा मुक्तीचे हीरकमहोत्सवी वर्ष असल्याने त्यानिमित्ताने मोठ्या प्रमाणावर या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यानिमित्ताने पहिल्‍या, दुसऱ्या आणि तिसऱ्या विधानसभेतील हयात सदस्यांचा यानिमित्ताने उपराष्ट्रपतींच्या हस्ते गौरव करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी उपराष्ट्रपती चेन्नई येथून गोव्यात येतील. त्यानंतरचे ९ दिवस त्यांचा गोव्यात राजभवनावर मुक्काम असेल. दुपारी चार ते सायंकाळी सहा वगळता त्यांचे इतर सर्व कार्यक्रम हे खासगी आहेत. 
 

संबंधित बातम्या