आंतरराज्यीय बसस्थानकाची परिस्थिती गंभीर

First impression is the last impression
First impression is the last impression

पणजी: पणजी येथील गोवा राज्य आंतरराज्यीय बसस्थानक खराब स्थितीत असल्याचे दिसत आहे. प्रसाधनगृहांची व्यवस्था व बसण्याची सोय नसल्याने पर्यटक  आणि  इतर  प्रवशांची गैरसोय  होत आहे. येथे असलेले मोबाईल प्रसाधनगृह न वापरणाऱ्या परिस्थितीत पडले आहे. वापरात नसलेल्या बसेस देखील एकाच ठिकाणी उभ्या आहेत. ज्याचा वापर कोणत्याही बेकायदेशीर कामांसाठी होवू शकतो.

येथुन कदंबा बस स्थानकावर चालत जाव लागतं त्यासाठी नाल्यावर तात्पुरत्या असुरक्षित लाकडी पुलाचा वापर तेथिल नागरीक करत आहे. जो पुल कधी कोमडून पडेल हे सांगता येत नाही. गोव्याकडे लोकं पर्यटन क्षेत्र म्हणून बघतात परंतु गोव्यात आल्यावर असे दृष्य दिसल्यास पर्यटक आणि इतरही काय विचार करतील असा प्रश्न .थे उपस्थित होत आहे. इंग्रजीमध्ये एक म्हण आहे "First impression is the last impression"  आणि गोव्यामध्ये पाऊल ठेवल्यानंतर पर्यटकांना  हे दृष्य दिसत आहे. आजूबाजुचा परिसर अस्वच्छ असल्याचे याठिकाणी दिसून येत आहे.

२०१६ पासून पणजी स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी विकसित होत आहे, परंतु त्यांचे बहुतेक प्रकल्प अपूर्ण राहिले आहे  किंवा अतिशय मंद वेगात सुरू आहेत. असेच समजावे लागेल.

आणखी वाचा:

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com