
पाळी: यंदाच्या पावसाळ्यातील पहिलीच गढूळ पाण्याची समस्या काल (मंगळवारी) खांडेपार येथील ओपा नदीच्या पाण्यात दिसली. ओपाचे हिरवेगार पाणी लाल रंगाने माखले होते, मात्र अचानक ओपा नदीचे पात्र लाल होण्याचे कारण म्हणजे एखाद्या खनिज मालाच्या लोह प्रकल्पातून हा खनिज गाळ नदीत सोडला की काय, याबद्दल पर्यावरणप्रेमीत उलटसुलट चर्चा होताना दिसली.
(first time in this monsoon, the water of Opa river became muddy)
ओपा नदीच्या पात्रात या पावसाळ्यात पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात गढूळ पाणी दिसले. गढूळ पाण्यामुळे ओपातील पाणी प्रकल्पावर विपरित परिणाम होत असून पाणी शुद्ध करताना फिल्टर खराब होण्याचा धोका असतो. गढूळ पाणी स्वच्छ करताना फिल्टर चिखलाने माखत असल्याने पुन्हा पुन्हा हे फिल्टर स्वच्छ करावे लागत असल्याने काम वाढते, त्यामुळे हे गढूळ पाणी टप्प्याटप्प्याने स्वच्छ करण्यासाठी प्रयत्न केले जातात. गेल्या वर्षी ओपा नदीच्या पात्रात सर्वात जास्त गढूळ पाणी जून महिन्यात 22 तारखेला तर ऑक्टोबर महिन्यात 6 तारखेला सापडले होते. यंदा काल ऑगस्ट महिन्याच्या 2 तारखेला या पावसाळ्यातील पहिलेच सर्वाधिक गढूळ पाणी नदीत आढळले असल्याची माहिती ओपा जल प्रकल्पातील अधिकाऱ्यांनी दिली.
दरम्यान, गढूळ पाण्याचा धोका दूर करण्यासाठी नदीच्या पात्रालगत असलेल्या लोह प्रकल्पांची तपासणी करण्याची आवश्यकता असल्याचे पर्यावरणप्रेमींचे मत आहे. पावसाळ्यात ओपा नदीचे पाणी गढूळ होण्याचे प्रकार अधूनमधून होत असल्याने त्याला नेमका कोणता घटक जबाबदार आहे, याचाही शोध घ्यावा व लोकांच्या मनातील शंका दूर करावी, असेही पर्यावरणप्रेमींचे मत आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.