जुन्या गोव्यात फेस्तनिमित्त पोलिस बंदोबस्त

दैनिक गोमंतक
मंगळवार, 24 नोव्हेंबर 2020

आता आजपासून म्हणजेच 24 नोव्हेंबरपासून सुरू होणारया  सेंट फ्रान्सिस झेवियरच्या नोवेंना लोकांसाठी खुल्या होणार नाहीत. अशी माहीती सुत्रांनी दिली.

पणजी: जगात पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या जुने गोवे चर्चला दरदिवशी सुमारे पाच हजारांहून अधिक पर्यटक भेट देत असतात. या चर्चच्या आवारात कोविड मार्गदर्शक सूचनांचे पालन करून भेट देणाऱ्या पर्यटकांची नोंद केली जात होती. परंतु आता आजपासून म्हणजेच 24 नोव्हेंबरपासून सुरू होणारया  सेंट फ्रान्सिस झेवियरच्या नोवेंना लोकांसाठी खुल्या होणार नाहीत. अशी माहीती सुत्रांनी दिली.

बॉम जिझस ओल्ड गोव्याच्या बॅसिलिकामध्ये आजपासून सुरू होणाऱ्या प्रार्थनेची वेळ सकाळी सहा, सात आणि आठ अशी असणार आहे. आणि फेस्तनिमित्त सुरू होणारा नोव्हेना (प्रार्थना)येत्या तीन तारखेपर्यंत असणार आहे.  फेस्तनिमित्त नोव्हेना (प्रार्थना) सुरू होत असून, राज्यात हिल्यांदाच त्या ऑनलाईनद्वारे होणार आहेत. पर्यटकांना या ठिकाणी बंदी घातल्यामुळे काही स्थानिक प्रसार माध्यमांद्वारे नोव्हेना ऑनलाइन लाइव्ह प्रसारित केली जाईल.

दरवर्षी या जुने गोवे फेस्तासाठी देश - विदेशातून मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात. या चर्चच्या आवारात फेस्ताच्या दिवशी भाविक लाखोच्या संख्येने भेट देतात. राज्यातील कानकोपऱ्यातून ख्रिश्‍चन बांधव नोव्हेनासाठी दरवर्षी पस्थिती लावतात, मात्र कोविड महामारीच्या मार्गदर्शक सूचनांमुळे त्यांना यावर्षी उपस्थिती लावता येणार नाही.

या फेस्तानिमित्त वाहतूक पोलिसांनीही सुरक्षिततेच्या दृष्टीने आराखडा तयार करण्यास आला आहे. फेस्ताला ख्रिश्‍चन बांधवांचा दरवर्षीप्रमाणे महापूर लोटला जाणार नसल्याने वाहतूक मार्गात बदल करण्याची तेवढी आवश्‍यकता नाही असा पोलिसानी मत व्यक्त केले. मात्र फेस्ताच्या दिवशी पर्यटक व स्थानिक लोकांची उपस्थिती वाढण्याची शक्यता असल्याने या ठिकाणी वाहतूक पोलिस तसेच पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

 

संबंधित बातम्या