Goa Black Fungus: गोव्यात म्युकरमायकोसिसचा पहिला बळी; आणखी 6 जणांना लागण 

दैनिक गोमंतक
मंगळवार, 18 मे 2021

कोविड 19 विषाणू संक्रमणानंतर राज्यात म्युकरमायकोसिसने पहिला बळी घेतला आहे. राज्यात म्युकरमायकोसिस आजारांचे आणखी 6 रुग्ण असल्याची माहिती राज्याच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली आहे.

पणजी : कोविड 19 विषाणू संक्रमणानंतर राज्यात म्युकरमायकोसिसने (Mucormycosis)  पहिला बळी घेतला आहे. राज्यात म्युकरमायकोसिस आजारांचे आणखी 6 रुग्ण असल्याची माहिती राज्याच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली आहे.  राज्य सरकारला गोवा मेडिकल कॉलेजमध्ये (GMC) या सहा प्रकरणांची माहिती आहे.  परंतु दक्षिण गोव्यातील खासगी रुग्णालयात या आसलेल्या दोन प्रकरणांबाबत  अद्याप गोंधळ असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. जीएमसीतील सहा कोविड -19 रूग्णांमध्ये म्यूकरमायकोसिस म्हणजेच काळी बुरशीजन्य आजार आढळून आला आहे. पण ते रुग्ण उपचारला योग्य प्रतिसाद देत असल्याचे जीएमसीचे अधिष्ठाता (Dean)डॉ. शिवानंद बांदेकर यांनी म्हटले आहे.  (First victim of mucomycosis in Goa; 6 more infected) 

फोंडा नगराध्यक्षपदी शांताराम कोलवेकर यांची निवड  

दरम्यान,  राज्यात अ‍ॅम्फोटेरिसिन बी वायल्सची (Amphotericin B vials) मोठी कमतरता आहे.  गोव्यात म्युकरमायकोसिसच्या सहा रुग्णांवर उपचार सुरू आहेत. या सहा रुग्णांना कोविड 19 उपचाराच्या वेळी म्यूकरमायकोसिस झाल्याचे आढळून आल्यानंतर अद्याप त्यांना घरी सोडण्यात आले नाही. या सर्व सहा रुग्णांवर सध्या जीएमसीमध्ये उपचार सुरू असल्याचे डॉ. शिवानंद बांदेकर यांनी स्पष्ट केले आहे.  तर, अ‍ॅम्फोटेरिसिन बी वायल्सची कमतरता असल्याचे  रुग्णांचे नातेवाईक सोशल मीडियावर औषधांसाठी आव्हान करत आहेत. त्याचबरोबर  मुंबई, बेंगळुरू, पुणे आणि बेळगाव   या ठिकाणांहून  औषध मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. 

Tauktae Cyclone Goa: सासष्टीत चक्रीवादळामुळे पिकांचे नुकसान

धक्कादायक बाब म्हणजे, राज्यातील मंडगावच्या होली स्पिरीट चर्चजवळील खासगी रुग्णालयात  8 दिवसांपूर्वी म्हणजे 11 मे रोजी म्युकरमायकोसिसचा पहिला बळी गेला.  त्यानंतर  राज्यात  म्युकरमायकोसिसचे रुग्ण नसल्याची माहिती आरोग्य सेवा संचालक डॉ. जोस डी  यांनी दिली होती. या पहिल्या रुग्णाला अ‍ॅम्फोटेरिसिन बीचे दोन डोस दिले गेले होते. परंतु एका दिवसानंतर त्याचा मृत्यू झाला.  त्यानंतर 12 मे रोजी दुसऱ्या रुग्णाची म्युकरमायकोसिसचा अहवाल पॉझिटिव्ह आला. या रुग्णावर  मडगावातील मलभाट  येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. “आमच्याकडे कोविड -19 पॉझिटिव्ह असलेला  म्युकरमायकोसिसचा एक रुग्ण आहे. आम्ही शक्य तितके चांगले काम करत असल्याचे  खासगी रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरांनी म्हटले आहे. नाक, डोळे, मेंदूत आणि सायनसमध्ये संसर्ग झालेल्या म्युकरमायकोसिसच्या संसर्गावर अनेक तज्ञ  संशोधन करत आहेत, मात्र राज्यसरकार यापासून पूर्णपणे अलिप्त असल्याचे दिसत आहे. 

संबंधित बातम्या