Fish Market: सोपो न दिल्‍यास वाहने रोखू
Fish MarketDainik Gomantak

Fish Market: सोपो न दिल्‍यास वाहने रोखू

मडगाव घाऊक मासळी मार्केट कंत्राटदाराचा इशारा

सासष्टी: घाऊक मासळी मार्केटमध्ये (Fish Market) मासळी व्यावसायिकांना सुरळीतपणे मासळी विक्री करण्यास मिळण्यासाठी मार्केटमध्ये योग्य सुविधा पुरविण्यासाठी आपण भर देत आहे. तरीही, मार्केटमध्ये सुविधा न पुरविल्यास 1 डिसेंबरपासून सोपो शुल्क देणार नसल्याचे वक्तव्य घाऊक मासळी व्यवसायिक संघटनेचे अध्यक्ष इब्राहिम मुसा यांनी केले आहे. मार्केटमध्ये येणाऱ्या मासळीवाहू वाहनांनी सोपो शुल्क न दिल्यास एकाही वाहनांना मार्केटच्या बाहेर जाऊ देणार नाही, असा इशारा घाऊक मासळी मार्केटचे सोपो कंत्राटदार मिलाग्रीस फर्नांडिस यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

आरोप तथ्‍यहीन : फर्नांडिस

घाऊक मासळी मार्केटमध्ये मासळीचा अवैधरित्या व्यवसाय करण्यास मिळत नसल्यामुळे घाऊक इब्राहिम मुसा हे आपल्यावर तथ्यहीन आरोप करत आहे. मासळी मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात सांडपाणी सोडण्यात येत असल्याचे इब्राहिम यांनी आरोप केला आहे. हे सांडपाणी महाराष्ट्र व कर्नाटक येथून येणाऱ्या मासळीवाहू वाहनांकडून सोडण्यात येत आहे. त्‍‍यावर इब्राहिम मुसा यांनी भर देणे गरजेचे आहे. मार्केटमध्ये पाचशेच्या वर मासळी विक्रेत्यांना व्यवसाय करण्यास देत असल्याचा आरोप इब्राहिम यांनी केला आहे. जर मार्केटमध्ये पाचशे विक्रेत्यांना व्यवसाय करण्याची मुभा दिल्यास परराज्यातून येणाऱ्या एकाही वाहनांना मार्केटमध्ये जाण्यास जागा मिळणार नाही, असे मिलाग्रीस फर्नांडिस यांनी सांगितले.

Fish Market
Margao Fish Market: सुविधा पुरवा अन्यथा सोपो देणार नाही

घाऊक मासळी मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात परराज्यातून येणारी वाहने रस्त्याचा बाजूला उभी करण्यात आल्यामुळे या परिसरात ये - जा करण्यास अन्य वाहनांना त्रास सहन करावा लागत आहे. पोलिसांनी यावर लक्ष केंद्रीत करणे आवश्यक आहे. घाऊक मासळी व्यावसायिक संघटनेत परप्रांतीयांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असून ही संख्या इब्राहिम हे स्वतःच्या फायद्यासाठी वाढवत आहेत, असा आरोप मिलाग्रीस फर्नांडिस यांनी केला. तर, मार्केटमध्ये रेल्वेतून चोरीने आणण्यात येणारी मासळी विक्रीसाठी आणण्यात येत आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com