‘चढणीचे मासे’ उपलब्ध; बाजारात खवय्यांसाठी 250 ते 500 रुपये वाटा

वर्षा ऋतू सुरू झाली की, समुद्रातील बोटीने होणारी मासेमारी बंद होते. त्यामुळे बाजारातील मासळीची आवकही मंदावते.
‘चढणीचे मासे’ उपलब्ध; बाजारात खवय्यांसाठी 250 ते 500 रुपये वाटा
Goa Fish Dainik Gomantak

योगेश मिराशी

म्हापसा : वर्षा ऋतू सुरू झाली की, समुद्रातील बोटीने होणारी मासेमारी बंद होते. त्यामुळे बाजारातील मासळीची आवकही मंदावते. मग नदी किनाऱ्यावर बसून गळ टाकून मासेमारी केली जाते. पण याच काळात शेतात जाऊन चढणीचे मासे पकडण्यास सुरुवात झाल असून पहिल्या पावसात अनेक ठिकाणी हे मासे पकडण्यासाठी अनेक जण कार्यरत आहेत. गोव्यात चढणीच्या माशांपासून बनविलेले ‘आंबोट-तिख’ ही मान्सूनची खासियत असते.

Goa Fish
सिंधुदुर्ग-गोव्याचे ऋणानुबंध आणखी भक्कम : प्रवीण आर्लेकर

पहिला पाऊस येताच, मच्छीमार नदीकाठी चढणीचे मासे पकडण्यासाठी शेतात जातात. हे मासे पकडण्यासाठी कला व अचूक वेळ असणे आवश्यक असल्याचे बोलले जाते. अशाच प्रकारे किटला-हळदोणा येथील निकोलस बार्बोझा या स्थानिक मच्छीमारांना पहिल्याच मुसळधार पावसात मोठ्या प्रमाणात कॅटफिश पकडण्यात यश आले.

या मासळीचा दर पहिल्या पावसाळ्यामुळे जरा अधिक असतो. ज्याची किंमत ही 250 ते 500 रुपयांना एक वाटा उपलब्ध होत आहे. आत्ता काही दिवस या मासळीची आवक वाढण्याची शक्यता आहे.

खवय्यांसाठी पहिल्या पावसाळ्यातील ही मासळी विकत घेण्यास कुठलीच हरकत नसते. ते आनंदाना मासे खरेदी करतात. या माशांपासून बनविलेले ‘आंबोट-तिख’ हे थोडेसे मसालेदार असते. त्यामुळेच प्रत्येक जण या खास माशाची आतुरतेने वाट पाहात असतो

बार्बोझ म्हणाले, पहिल्या पावसात कॅटफिश पकडणे, हे अतिशय अनोखे दिव्य असते. हे मासे खाण्यास अतिशय चविष्ट असतात. हे मासे फक्त एक-दोन दिवसांसाठीच पकडता येतात. आणि त्यामुळे अचूक वेळ असल्याने अनेकजण ती पकडण्याची संधी गमावतात.बाजारात कॅटफिश उपलब्ध

बार्बोझा सांगतो, मी पहिल्या मुसळधार पावसाच्या आगमनाची वाट पाहतो होतो. मी दरवर्षी जाऊन हे चढणीचे मासे पकडतो. कॅटफिश पकडण्यासाठी अतिवृष्टीची गरज असते. शिवाय हे मासे पकडण्यासाठी योग्य वेळ हवी असते आणि त्यासाठी वापरलेले साधने म्हणजे, एक लांब चाकू आणि एक टॉर्च. आज स्थानिक बाजारपेठ ही विविध दरांसह या कॅटफिशची आवक मोठी होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com