Vasco Fish Market : वास्को शहरातील मासळी विक्री स्टॉल्सबाहेरील पॅंडल जमीनदोस्त

कारवाई : संतप्त मासळी विक्रेत्या महिलांचा मुरगाव पालिकेवर मोर्चा
Vasco News
Vasco NewsDainik Gomantak

Vasco Fish Market : फिश मार्केट विक्रेत्यांचे नेते क्रिस्तोड डिसोझा यांच्या नेतृत्वाखाली आज वास्कोच्या संतप्त मासळी विक्रेत्यांनी मुरगाव पालिकेवर मोर्चा काढला. नगराध्यक्ष लिओ रॉड्रिग्स यांची भेट घेत लमाणी महिला तसेच घाऊक मासळी विक्रेते अजूनही लपून मासे विक्री करत असल्याची तक्रार केली.

घाऊक मासळी विक्री स्टॉल्सच्या बाहेरील पॅंडल पाडण्याच्या कामाला पालिकेने सुरवात केली आहे. पालिका कामकाजानंतर संध्याकाळी पोलिस तैनात करण्यात येणार असल्याचे आश्वासन नगराध्यक्ष लिओ रॉड्रिग्स यांनी दिले.

वास्को येथील मार्केटमधील मासळी विक्रेत्यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर मुरगाव पालिकेने येथील घाऊक मासळी विक्रेत्यांविरोधात कारवाई सुरू केली आहे. मात्र, रस्त्याच्याकडेला मासे विक्री करणाऱ्या महिला व पालिका निरीक्षक, कामगार यांच्यामध्ये लपाछपीचा खेळ सुरू होता. दरम्यान, सोमवारी मासळी विक्रेत्यांसह आलेले क्रिस्टोद डिसोझा यांनी केलेले आरोप मुरगावचे नगराध्यक्ष लिओ रॉड्रिग्ज यांनी फेटाळले.

Vasco News
Vasco News: शहरातील मासळी विक्री स्टॉल्सबाहेरील पॅंडल जमीनदोस्त

डिसोझा यांनी नाहक आरोप करू नये, असे रॉड्रिस यांनी सांगितले. पालिकेने आधीच अतिक्रमण आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या विक्रेत्यांविरुद्ध मोहीम सुरू केली आहे आणि घाऊक मासळीची दुकाने बंद ठेवण्यासाठी आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी मुख्य अधिकाऱ्यांनी एक टीम पाठवली. आजही कारवाईचा बडगा चालू होता.

‘त्या’ विधानाचा निषेध

स्थानिक वास्को मासळी बाजार विक्रेत्यांनी केलेल्या विरोधानंतर, मुरगाव पालिकेने मंगळवारी खारीवाडा येथून सुरू असलेली घाऊक मासळी विक्री केंद्रे बंद करण्यासाठी निरीक्षकांची एक टीम पाठवली व त्यांचा व्यवसाय बंद केला. घाऊक विक्रेत्यांकडून आर्थिक लाभ मिळवत असल्याचा आरोप करणाऱ्या फिश मार्केट विक्रेत्यांचे नेते क्रिस्तोड डिसोझा यांच्या विधानाचा पालिका प्रशासनाने निषेध केला.

Vasco News
Vasco : अपररॅम्प उभारण्यासाठी पत्रे लावून एफएल गोम्स मार्ग वाहतुकीसाठी बंद

इशाऱ्यानंतर कारवाईला वेग

काही घाऊक मासळी विक्रेत्यांमुळे आमच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे. त्यांचा व्यवसाय बुधवारपर्यंत बंद करण्यात आला नाही, तर आम्ही मुरगाव पालिका इमारतीसमोर मासळी विक्री करण्यासाठी बसू, असा इशारा सोमवारी मार्केटातील मासळी विक्रेत्यांनी दिला होता. त्यामुळे नगराध्यक्ष रॉड्रिग्ज व मुख्याधिकारी जयंत तारी यांनी दखल घेताना त्वरित कारवाई सुरू केली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com