गोमंतकीयांना मिळणार नाही 1 जूनपासून आवडीचे मासे...

Fishing.jpg
Fishing.jpg

पणजी: सालाबादप्रमाणे १ जूनपासून राज्यातील मासेमारी (Fishing) बंद होणार आहे. तब्बल ६१ दिवस मासेमारी होणार नाही. त्यातच ‘कोविड’ (Covid-19) संकटाचा वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर परराज्यातून होणारी चिकनच्या (Chicken) कोंबड्या आणि माश्यांची आयात रखडली आहे. परीणामी, राज्यातील नागरिकांना पुढील दोन महिने ताज्या मासळीविना काढावे लागणार असून, सुकी मासळीचे दर वाढण्याची शक्यता आहे. (Fishing closed in Goa from June 1)

मासे हा गोमंतकीयांचा ‘विक पॉईंट’ आहे. जग इकडे तिकडे झाले तरी गोमंतकीय नागरिकांच्या रांगा मच्छी मार्केटमध्ये दिसणे हे काही विशेष नाही. यंदा मान्सून वेळेत गोव्यात पोहचणार असल्याचे सुतोवाच हवामान वेधशाळेने केले आहे. परीणामी, १ मेपासून राज्यातील मासेमारी बंद करण्याचे आदेश मच्छीमार खात्याने दिले आहेत. त्यामुळे पुढील किमान ६१ दिवस गोमंतकीयांना त्यांच्या आवडीचे मासे मिळणार नाहीत. त्यांना चिकन, मटन आणि सुक्या मासळींवर अवलंबून राहावे लागणार आहे.

एकीकडे मासेमारी बंद होणार आहे, त्यामुळे जणू मोठे संकटच ओढवणार आहे. तर दुसरीकडे बेळगाव आणि कोकणात कोरोना प्रादुर्भावामुळे पोल्ट्री व्यवसाय धोक्यात आला आहे. चिकनच्या कोंबड्यांची आयात गेल्या कांही दिवसांपासून थंडावली असल्याचे मत पशूसंवर्धन खात्याचे अतिरिक्त संचालक प्रकाश कोरगावकर व्यक्त करतात. एकंदर गोमंतकीयांना पुढील दोन महिने शाकाहारावर गुजराण करावी लागणार हे निश्चित आहे.  

अंडीही महागणार! 

बेळगावमधील क्वॉलिटी पोल्ट्रीमधून गोव्याला अंड्यांची आवक मोठ्या प्रमाणात होते. सध्या सगळीकडेच पोल्ट्री व्यवसायावर आवकळा आली आहे. त्यामुळे अंडी उत्पादनातही घट झाली आहे. त्याचा परिणाम राज्यातील विक्रीवर होत आहे. आवक घटत चालल्याने अंड्यांचे दर कांही दिवसांत वाढतील, अशी शक्यता वर्तविली जात आहे.                                       आमच्या कंपनीमार्फत जिल्हाभरात अनेक पोल्ट्री चालविल्या जातात. कोंबड्यांच्या पालनावर परिणाम झाला नसला तरी वाहतुकीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे निर्यात रखडली आहे. पुढील काळात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यास निर्यातीवर आणखी मर्यादा येतील. राज्यांतर्गत निर्यातीवर परीणाम झाल्यास उत्पादनावरही परिणाम शक्य आहे. 


- डॉ. मधुकर पवार, मार्केटींग व्यवस्थापक क्वॉलिटी पोल्ट्री  कोंबड्यांची जेवढी मागणी करतो, त्या तुलनेत कमी कोंबड्या येत आहेत. लॉकडाउनमुळे बहुतेक ठिकाणाहून कोंबड्या येत नाहीत. पुढील काळात कोरोनाची तिसरी लाट आल्यास त्याच्यावर आणखी परीणाम होईल, असे वाटते. 
- अलिम बेपारी,  चिकन दुकानदार, माले

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com