आय़पीएल सट्टेबाजीप्रकरणी कांदोळीतील एका हॉटेलमधून पाच जणांना अटक

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 1 ऑक्टोबर 2020

एका हॉटेलात कळंगूट पोलिसांनी आज (गुरूवार) छापा टाकला. यात परदेशात सुरू असलेल्या आय़पीएल सट्टेबाजीप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे

पणजी- कांदोळी येथील एका हॉटेलात कळंगूट पोलिसांनी आज (गुरूवार) छापा टाकला. यात परदेशात सुरू असलेल्या आय़पीएल सट्टेबाजीप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे.

 दरम्यान, यावेळी छापा टाकण्यात आलेल्या ठिकाणाहून 95 हजार रूपये जप्त करण्यात आले आहेत. तसेच काही मोबाईल फोनही यावेळी जप्त करण्यात आले आहेत. कळंगूट पोलिस याप्रकरणी अधिक तपास करत असून यात अजून काही जण अडकण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या