नऊ गुरांना ठोकरले; पाच जागीच ठार

केरये - खांडेपार येथील घटना : अपघातानंतर वाहनासह चालकाचे पलायन
नऊ गुरांना ठोकरले; पाच जागीच ठार
नऊ गुरांना ठोकरले; पाच जागीच ठारDainik Gomantak

फोंडा: केरये - खांडेपार येथील चौपदरी महामार्गावर ठाण मांडून बसलेल्या मोकाट गुरांना अज्ञात वाहनाने (Vehicle) काल पहाटेच्या सुमारास नऊ गुरांना ठोकर दिल्याने पाच गुरे जागीच ठार झाली. त्यातील सहा मोकाट गुरे जखमी झाली असून जखमी गुरे रस्त्याच्या (Road) कडेला तडफडत होती. या घटनेची माहिती पशुसंवर्धन खात्याला दिल्यानंतर खात्याचे डॉ. माणिक पाटील, कर्मचारी अमृतराव नाईक, संतोष नाईक, अशोक हरमलकर यांनी उपचार करून जखमी गुरांना सिकेरी - डिचोली (Bicholim) येथील गोसेवा आश्रमात पाठवण्यात आले.

गुरे ठोकरण्‍याचे सत्र सुरूच

कुर्टी ते खांडेपार पुलावर व पुढे उसगाव तसेच म्हारवासडा मार्गावर कायम गुरांचे अपघात होत असून अज्ञात वाहनाने ठोकरण्याचे प्रमाण वाढले आहे. रात्रीच्यावेळेला हे प्रकार होत असून सकाळी रस्त्यावर मरून पडलेली किंवा जखमी गुरे दिसतात. तीन महिन्यांपूर्वी खांडेपार येथील नवीन पुलावर अज्ञात वाहनाने ठोकरल्याने तीन गुरे जागीच ठार झाली होती. म्हारवासडा भागात दोन महिन्यांपूर्वी दोन गुरे मृत्युमुखी पडलेली सकाळी निदर्शनास आली होती. या मार्गावर कायम गुरांना अपघात होत असून त्यामुळे दुचाकीस्वारही जखमी होण्याचे प्रकार घडले आहेत. वास्तविक पंचायत व पालिकांना भटक्या गुरांसंबंधी कार्यवाही करण्यासाठी सरकारी सूचना आहे, मात्र कोंडवाडे तसेच अन्य देखभाल यंत्रणा नसल्याने पालिका व पंचायती काहीच करू शकत नसल्याची माहिती देण्यात आली. सरकारी यंत्रणेने (Government) त्वरित लक्ष घालून मोकाट गुरांबाबत उपाययोजना करावी, अशी मागणी करण्‍यात येत आहे.

नऊ गुरांना ठोकरले; पाच जागीच ठार
गुडे-शिवोलीत पाच लाखांचे अंमलीपदार्थ जप्‍त

रस्त्यावरील गुरे वाहनाच्या धडकेने मृत्यू होण्याचे प्रकार वाढत असून चौपदरी महामार्गावर बसवण्यात आलेल्या खांब्यांवरील दिवे लागत नसल्याने अंधार पसरलेला असून त्यामुळे बेफाम वेगाने वाहने चालविणाऱ्या वाहनचालकांना (Driver) मोकाट गुरे दुष्टीस पडत नसल्याने महामार्गावर (Highway) बसवणाऱ्या मोकाट गुरांना अपघात (Accident) होत आहे.

- विराज सप्रे, सामाजिक कार्यकर्ता, फोंडा

भटक्या गुरांचे रस्त्यावरील मृत्यू टाळायचे असल्यास प्रत्येक तालुक्यात कोंडवाडे उभारण्याची गरज आहे. महामार्गावर (Highway) बेफाम वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांना रात्रीच्यावेळेला गुरे नजरेस पडत नसल्याने हे अपघात (Accident) होत आहेत,

- संदीप पारकर सामाजिक कार्यकर्ता, खांडेपार

पहाटेच्‍यावेळी अपघात

अज्ञात वाहनाने गुरांना ठोकरल्यानंतर चालकाने वाहनासह पळ काढला. गुरांना ठोकरलेले वाहन अवजड असावे, असा कयास व्यक्त करण्यात येत आहे. पहाटेच्या वेळेला अंधार असल्यामुळे चालकाला ही गुरे दृष्टीस पडली नसावी, असाही कयास व्यक्त करण्यात येत आहे. गुरांना ठोकरल्यानंतर त्यांच्या उपचारासाठी कोणतेही प्रयत्न न करता चालकाने पळ काढल्याने लोकांत तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com