Chaturthiच्या मुहूर्तावर म्हापशात दहा रुपयांना पाच नारळ!

प्रत्येकी दोन रुपये या किफायतशीर दराने अर्थांत प्रत्येकाला दहा रुपयांत पाच नारळ देऊन म्हापसा (Mhapsa) येथील गणेशभक्तांना महागाईतून अल्पसा दिलासा देण्याचा प्रयत्न आहे.
Chaturthiच्या मुहूर्तावर म्हापशात दहा रुपयांना  पाच नारळ!
CoconutDainik Gomantak

म्हापसा: म्हापसा (Mhapsa) येथील ‘एक्टिव म्हापसा सिटिझन्स असोसिएशन’ (‘आमका’) या कृतिशील नागरिकांच्या संस्थेने गणेशचतुर्थीच्या (Ganesh Chaturthi) पूर्वसंध्येच्या दिवशी याची व्यापक प्रमाणात कार्यवाही झाली. प्रत्येकी दोन रुपये या किफायतशीर दराने अर्थांत प्रत्येकाला दहा रुपयांत पाच नारळ देऊन म्हापसा येथील गणेशभक्तांना महागाईतून अल्पसा दिलासा देण्याचा प्रयत्न आहे.

या उपक्रमाचे सर्वेसर्वा तथा अध्वैर्यू असलेले असोसिएशनचे अध्यक्ष योगेश केळकर (Yogesh Kelkar) यांनी सांगितले, या नारळांचे वितरण म्हापसा शहरातील नगरपालिका उद्यानानजीक सिंडिकेट बँकेमागील एका दुकानातून सायंकाळी पाच ते आठ वाजेपर्यंत करण्यात आले.संघटनेचे सचिव अशोक च्यारी (Ashok Chari) म्हणाले, ‘आमका’ ही संघटना वर्ष 2017 पासून म्हापसा शहरात विविध सामाजिक क्षेत्रांत कार्य करीत आहे.

Coconut
Ganesh Chaturthi: आज सायंकाळी आकाशात पाहाच

दीड हजार कुटुंबांना लाभ

या उपक्रमाच्या अंतर्गत प्रत्येक कुटुंबाला नाममात्र दहा रुपयांच्या मोबदल्यात पाच नारळ देण्यात आले. या महिन्याच्या 5 तारखेपासून 8 तारखेपर्यंत साडेसात हजार नारळ वितरित करण्यात आले व त्याचा लाभ गरजू 1,500 कुटुंबांनी घेतला.

गणरायासाठी पूरग्रस्तांचीही लगबग

जोरदार पावसामुळे उध्वस्त झालेल्या अनेक पूरग्रस्त कुटुंबांना यंदाच्या चतुर्थीला गणेशमूर्तीचे पूजन घराबाहेर करावे लागत आहे. काहींनी गावातील मंदिराच्या प्रांगणात तर काहींनी कोसळलेल्या घराच्या जागीच मंडप उभारून गणेशमूर्ती पूजण्याची जागा तयार केली आहे.

Coconut
Ganesh Chaturthi 2021: गणरायासाठी पूरग्रस्तांचीही लगबग

सरकारने (Government) ज्यांची घरे पूर्णपणे कोसळली आहेत, त्यांना 2 लाख व ज्यांची घरे साधारण कोसळली आहेत त्यांना 1 लाख व काहींना 50 हजारांची मदत जाहीर केली. काहींच्या खात्यात ही रक्कम पोचली तर काहींच्या घरात कुणाच्या नावावर धनादेश काढावा याबाबत एकमत न झाल्याने खात्यात पैसे पोचले नव्हते. मात्र, कालच मुख्यमंत्र्यांनी सुमारे दिड कोटी रुपये मंजूर केले आहेत.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com