कोरोनाचे आणखी पाच बळी

Tejshri Kumbhar
सोमवार, 3 ऑगस्ट 2020

राज्यातील कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस आणखी बिकट होत आहे. रविवारी एका दिवसात पाच कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा बळी गेला. तसेच मागील चोवीस तासांत ३३७ कोरोनाबाधितांची आणखी भर पडली. ही सर्वाधिक संख्‍या आहे. राज्‍यात एकूण कोरोना बळींची संख्या ५३ पर्यंत पोहोचली आहे. राज्यात सध्या कोरोनाबाधितांची एकूण संख्‍या १८०९ झाली, तर २३० जणांच्‍या प्रकृतीत सुधारणा होऊन कोरोनामुक्त झाले. १९५१ एवढ्या रुग्णांचे कोरोना पडताळणी चाचणी अहवाल अद्याप प्रतीक्षेत असल्याची माहिती गोवा आरोग्य खात्याने दिली.

तेजश्री कुंभार

पणजी :

रविवारी दिवसभरात एकूण ३३७ जणांचे कोविड तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने लोकांत घबराट पसरली आहे. रविवारी मृत्‍यू झालेल्‍यांत सडा येथील ७२ वर्षीय पुरुष, झुआरीनगर येथील ५४ वर्षीय पुरुष, नवेवाडे येथील ७२ वर्षीय महिला, दुर्भाट येथील ५४ वर्षीय पुरुष आणि बायणा येथील ४५ वर्षीय महिलेचा समावेश आहे. त्‍यांचा मृत्यू मडगाव येथील कोविड रुग्णालयात झाल्याची माहिती मिळाली आहे.

१५६५जणांचे नमुने घेतले,
तर २५७४ अहवाल प्राप्‍त
आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आजच्या दिवशी २ देशी प्रवाशांना क्वारंटाईन करण्यात आले. हॉस्पिटल आयसोलेशनमध्ये ५४ जणांना, तर सुविधायुक्त क्वारंटाईन कक्षात ११ जणांना ठेवले आहे. १५६५ जणांच्‍या लाळेचे नमुने घेण्यात आले, तर २५७४ जणांचे अहवाल हाती आले आहेत. रेल्‍वे, विमान आणि रस्तामार्गे आलेले २२ रुग्ण आहेत. डिचोलीत ११, साखळीत ४२, पेडणेत १८, वाळपईत २८, म्हापसा येथे ६३, पणजीत ७७, बेतकी येथे १४, कांदोळीत ३६, कोलवाळ येथे ३२, खोर्लीत १८, चिंबल येथे १०६, पर्वरीत ४३, कुडचडेत १८, काणकोणात ७, मडगावात १२१, वास्कोत ४०१, लोटलीत ३६, मेरशीत २२, केपेत १९, सांगेत १०, शिरोडा येथे २२, धारबांदोडा येथे २२, फोंडा येथे ११०, नावेलीत २८ आणि राज्यात इतर ठिकाणीही रुग्ण आढळल्‍याची माहिती आरोग्य खात्याने दिली

राजधानीत संसर्ग वाढतोय
राजधानी पणजीमध्ये गेल्या कित्येक दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण वाढतच आहेत. रुग्‍णसंख्‍या ७७ पर्यंत पोहोचली आहे. तरीही बाजारपेठा आणि राज्यात इतर ठिकाणी असणारी गर्दी कमी होत नाही. अनेक ठिकाणी सामाजिक अंतराच्या नियमाचा फज्जा उडताना दिसून येत आहे. जेथे रुग्ण सापडेल तेथे निर्जंतुकीकरण केले जात आहे. तरीही लोकांनी आता सामूहिक प्रसार थांबिविण्यासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे. मिळालेल्या माहितीनुसार राजधानी पणजीत दिवसभरात दोन कोविड पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडल्याची माहिती मिळाली.

कोरोना संसर्गस्थळे
वास्को ४०१
पणजी ७७
मडगाव १२१
फोंडा ११०
चिंबल १०६
साखळी ४२
शिरोडा २२
पेडणे १८
वाळपई २८
डिचोली ११
म्‍हापसा ६३
हळदोणा २०
कांदोळी ३६
कोलवाळ ३२
पर्वरी ४३

संपादन : महेश तांडेल

संबंधित बातम्या