राज्यात चोवीस तासांत कोविडचे पाच बळी

गोमंतक वृत्तसेवा
गुरुवार, 12 नोव्हेंबर 2020

राज्यात आणखी पाच कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला. ज्यामुळे राज्यात आजवर कोरोनामुळे मृत्यू झाला त्यांची संख्या ६५६वर येऊन पोहचली आहे.

पणजी : राज्यात आणखी पाच कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला. ज्यामुळे राज्यात आजवर कोरोनामुळे मृत्यू झाला त्यांची संख्या ६५६वर येऊन पोहचली आहे. आज राज्यात १०९ जणांना कोरोनाची लागण झाली तर १५२ जण कोरोनमुक्त झाले आहेत. राज्यात १८१३ इतके कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. 
आज मृत्यू झालेल्या लोकांमध्ये सांता क्रूझ येथील ५५ वर्षीय पुरुष, कारवार येथील ७१ वर्षीय पुरुष, अस्नोडा येथील ३४ वर्षीय पुरुष, वास्को येथील ७० वर्षीय महिला आणि वास्को येथील ५९ वर्षीय पुरुष यांचा मृत्यू झाला आहे. यातील चार मृत्यू गोवा वैद्यकीय महाविद्यालयात आणि १ मृत्यू इएसआय इस्पितळ मडगाव येथे झाला आहे. 

गेल्या चोवीस तासात १४६९ चाचण्या करण्यात आल्या. आज ७२ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी होम आयसोलेशनचा पर्याय निवडला तर ३५ रुग्णांना इस्पितळात भरती करण्यात आले. राज्यात कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी अजून खाट शिल्लक आहेत. उत्तर गोव्यात १९७ खाट तर दक्षिण गोव्यात २०१ खाट शिल्लक आहेत.

डिचोली आरोग्य केंद्रात ४८ रुग्ण, साखळी आरोग्य केंद्रात ४७ रुग्ण, पणजी आरोग्य केंद्रात ९७ रुग्ण, कांदोळी आरोग्य केंद्रात ७७ रुग्ण, चिंबल आरोग्य केंद्रात ७६ रुग्ण, मडगाव आरोग्य केंद्रात १३९ रुग्ण, वास्को आरोग्य केंद्रात १०६ रुग्ण, फोंडा आरोग्य केंद्रात १४९ रुग्ण आणि नावेली आरोग्य केंद्रात ५७ रुग्ण कोरोनाच्या उपचारासाठी भरती आहेत.

संबंधित बातम्या