वझरीत पाच, हसापुरात एक पॉझिटिव्ह

dainik Gomantak
रविवार, 5 जुलै 2020

देउळवाडा - वझरी येथे आज आणखी पाच, तर हसापूर येथे एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण मिळून सहा रुग्ण सापडले आहेत. वझरी येथे या अगोदर पाच कोरोना पॉझिटिव्ह सापडले होते. देऊळवाडा - वझरी येथे आतापर्यंत एकूण दहा कोरोना रुग्ण झाल्याने खबरदारीचा उपाय म्हणून आज वझरी गावातील देऊळवाडा परिसर रस्त्यांवर बॅरिकेड लावून सील करण्यात आला आहे. तसेच या ठिकाणी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

पेडणे
देऊळवाडा - वझरी येथील यापूर्वी कोरोनाबाधित असलेले तिघेजण वेर्णा औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीत कामाला होते. चौथा रुग्ण हा पणजी येथील अग्निशमन दलातील जवान होता. पाचवा रुग्ण पर्वरी येथे आयआरबीआय पोलिस सेवेतील होता. वेर्णा येथील औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीत कामाला असलेल्या तिघांचेही कोरोना पॉझिटिव्ह अहवाल मिळाल्यानंतर त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचीही चाचणी करण्यात आली होती. त्यात त्यांचा पॉझिटिव्ह अहवाल मिळाला. त्यात एका रुग्णाची आई, वडील व बहीण, दुसऱ्या रुग्णाची पत्नी, तर तिसऱ्या रुग्णाच्या आईचा पॉझिटिव्ह अहवाल आला, तर वेर्णा येथील औद्योगिक वसाहतीतील त्याच कंपनीत कामाला असलेल्या हसापूर येथील एका युवकाचा पॉझिटिव्ह निकाल आल्याने या सहाही जणांना आज फर्मागुढी येथील उपचार केंद्रात दाखल करण्यात आले आहे. विर्नोडा येथे सापडलेला पॉझिटिव्ह रुग्ण हाही वेर्णा येथील औद्योगिक वसाहतीतील त्याच कंपनीत कामाला होता. सध्या वझरी गावात निर्माण झालेल्या परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी सर्व ग्रामस्थांनी सहकार्य करावे, असे आवाहन सरपंच स्मिता कळंगुटकर यांनी केले आहे.

वेर्णा येथून कोरोना वझरी, विर्नोड्यात
पेडणे तालुक्यात आतापर्यंत कोरोनाचे सापडलेले एकूण १४ रुग्ण झाले आहेत. त्यात कोरगाव येथे सापडलेल्या सासू, सून या मुंबई येथून आलेल्या होत्या. पालये येथील कदंब कर्मचारी नंतरच्या चाचणीत निगेटिव्ह झाला, तर वझरी, हसापूर व विर्नोडा येथे एकूण चौदा रुग्ण सापडले .त्यापैकी पाच रुग्ण हे वेर्णा येथील औद्योगिक वसाहतीतील एकाच कंपनीत कामाला होते. या पाचही जणांना तिथे कोरोनाचा संसर्ग झाला. त्यांना कोरोनाची लागण झाल्यावर त्यापैकी चारजणांचा संपर्क घरच्या लोकांशी आल्यावर कुटुंबातील सदस्यांना त्याचा संसर्ग झाला, तर विर्नोडा येथील वेर्णा येथे औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीत काम करणाऱ्या युवकाने त्याची तपासणी झल्यावर कुटुंबातील सदस्यापासून दूर राहून आवश्यक काळजी घेतल्याने त्याचे कुटुंबीय बचावले.

Goa Goa Goa Goa Goa Goa Goa Goa

संबंधित बातम्या