गोवा: भाजप कार्यकर्त्यांच्या घरांवर फडकणार झेंडे

दैनिक गोमंतक
सोमवार, 5 एप्रिल 2021

6 एप्रिल 1980 रोजी जनता पक्षाचे रूपांतर भारतीय जनता पक्षामध्ये झाले होते.

पणजी: 6 एप्रिल 1980 रोजी जनता पक्षाचे रूपांतर भारतीय जनता पक्षामध्ये झाले होते. याच मुहूर्तावर भारतीय जनता पक्ष गोव्यात स्थापना उद्या 6 एप्रिलला कार्यकर्त्यांच्या घरावर पक्षाचे झेंडे फडकवणार आहे. राज्यात 19 ठिकाणी यासाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी ही माहिती दिली. (Flags will be flown at the homes of BJP workers on the occasion of BJP founding day)

गोवा: ‘ते’ वादग्रस्त ट्विट कर्मचाऱ्यास भोवले

भाजप (BJP) उद्यापासून सेवा सप्ताह पाळणार आहे. त्याची पूर्वतयारी भाजपने केली आहे. दोन दिवसांपूर्वी प्रदेशाध्यक्ष व संघटन सचिव सतीश धोंड (Satish Dhonde) यांनी मंडळ अध्यक्ष, सचिव, मतदारसंघ प्रभारी यांच्याशी याविषयी चर्चा केली होती. निवडणूक (Election) वर्ष असल्याने भाजपने आक्रमकपणे राज्यभरात आपले अस्तित्व दिसेल याचे नियोजन केले आहे.

संबंधित बातम्या