युवकांना स्वतःचा व्यवसाय-उद्योग सुरू करण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे: पंतप्रधान

गोमंतक वृत्तसेवा
रविवार, 8 नोव्हेंबर 2020

जागतिकीकरण महत्त्वाचे असले तरी आत्मनिर्भरता देखील आवश्‍यक आहे, हाही मंत्र कोरोना महामारीने साऱ्या जगाला दिला आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सांगितले. भारतीय तंत्रज्ञान संस्था, दिल्लीच्या (आयआयटी) ५१ व्या पदवीदान कार्यक्रमाला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मोदी यांनी संबोधित केले.

नवी दिल्ली: जागतिकीकरण महत्त्वाचे असले तरी आत्मनिर्भरता देखील आवश्‍यक आहे, हाही मंत्र कोरोना महामारीने साऱ्या जगाला दिला आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सांगितले. भारतीय तंत्रज्ञान संस्था, दिल्लीच्या (आयआयटी) ५१ व्या पदवीदान कार्यक्रमाला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मोदी यांनी संबोधित केले. ते म्हणाले की, कोरोना महामारीमुळे निर्माण झालेल्या सध्याच्या परिस्थितीत तंत्रज्ञानाची भूमिका महत्त्वाची आहे. आज आयआयटीच्या विद्यार्थ्यांना २०१९-२० या वर्षाची पदवी प्रदान करण्यात आली. महामारीनंतरच्या जगात तंत्रज्ञानाला अनन्यसाधारण महत्त्व मिळेल असेही ते म्हणाले. 

अतिशय कठीण अशी जेईई परीक्षा उत्तीर्ण होऊन तुम्ही आयआयटीमध्ये आला आहात. तुमच्यात प्रचंड क्षमता आहे. मात्र लवचिकता व विनम्रता या दोन गोष्टी तुमच्या क्षमतावृद्धीसाठी अत्यंत उपयुक्त ठरतील असे पंतप्रधानांनी नमूद केले. आयआयटीच्या विद्यार्थ्यांना त्यांनी सांगितले, की गुणवत्तेशी तडजोड करू नका. नव्या तंत्रज्ञानाचा स्वीकार करण्यास खळखळ करू नये आणि अस्थिरता हा आयुष्याचाच एक मार्ग असल्याने त्याची तयारी ठेवावी.व्यक्तिगत प्रयत्नांना मर्यादा असतात. त्यामुळे संघभावनेने काम करण्याची मानसिकता ठेवावी. भारतात युवकांना स्वतःचा व्यवसाय-उद्योग सुरू करण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे,असे मोदी म्हणाले.

संबंधित बातम्या