आर्थिक संकटामुळे घर उभारणी प्रक्रिया लांबणीवर; सरकारकडूनही अन्याय

बोणकेवाड्यातील पूरग्रस्तांनी हलवला झोपडीत आसरा
आर्थिक संकटामुळे घर उभारणी प्रक्रिया लांबणीवर; सरकारकडूनही अन्याय
Goa : बोणकेवाडा वांते येथे उभारलेली झोपडी Dainik Gomantak

पर्ये: बोणकेवाडा वांते सत्तरी येथील दुर्घम भागात असलेल्या उत्तम गावडे व पांडुरंग गावडे या दोन्ही भावांची आर्थिक स्थिती बिकट असल्याने त्यांचे घर उभारणी प्रक्रिया लांबणीवर पडली आहे. म्हादईच्या उजव्या तीरी यांचे मातीचे घर दोन महिन्यांपूर्वी आलेल्या म्हादई पुराच्या (Flood) पाण्याने जमीनदोस्त झाले होते. आता दोन महिन्याचा (Two Month) कालखंड उलटला तरी देखील यांनी अजूनही घर उभारणीस प्रारंभ केला नाही. यांचे घर न उभारण्याचे मुख्य कारण यांची असलेली बेताची आर्थिक स्थिती आहे. सरकारने त्यांना केवळ 1 लाखाची आर्थिक मदत दिली खरी पण सद्याच्या महागाईच्या काळात यातून काय यहोणार म्हणून त्यांनी अजून घर बांधणी कामाला सुरुवात केली नाही.

Goa : बोणकेवाडा वांते येथे उभारलेली झोपडी
Goa: केवळ शेतकऱ्यांचे हित जपणार; प्रवीण आर्लेकर
उभारलेली झोपडी
उभारलेली झोपडीDainik Gomantak

दरम्यान ही आदिवासी समाजातील दोन्ही कुटुंबे( एकूण 8 सदस्य) केवळ शेत मजुरी करून आपले जीवन जगणारी आहे. येथील एका जमीनदारांच्या शेत-बागायतीत काम करून तुटपुंज्या रोजगाराचे साधन यांच्यासाठी उपलब्ध आहे. यांना गांजे किंवा वांते या भागात यायचे झाल्यास अर्धा ते एक तास पायी चालत यावे लागते त्यामुळे त्यांना इतर रोजगाराच्या संधी निर्माण करणे कठीण होते. अशा परिस्थितीत यांची आर्थिक सुबत्ता झाली नाही. सद्य नवीन घर उभारणीचे प्रश्न यांच्याकडे आला तेव्हा हातात रक्कम काहीच नसल्याने काय करावे असा प्रश्न त्यांच्या समोर आला आहे.

सरकारकडून यांच्यावर अन्याय

दरम्यान या कुटुंबावर सरकारकडून अन्याय झाल्याचे स्पष्ट पणे दिसून येते. गोवा सरकारने जेव्हा पूरग्रस्तांना 2 लाखांची आर्थिक मदत जाहीर केली तेव्हा या कुटुंबाला रुपये दोन लाख मिळणार अशी यांची अपेक्षा होती कारण यांचे पूर्ण घर कोसळले होते. पण प्रत्यक्षात त्यांना एक लाख रुपयांची मदत देण्यात आली. कारण यांचे घर मातीचे असल्याचे स्पष्टीकरण मामलेदार कार्यालयातून मिळाले. चिऱ्यांच्या पक्क्या घराला 2 लाख रुपये आणि मातीच्या पक्क्या घराला 1 लाख रुपये ही योजना यांच्यावर अन्याय करणारी आहे. मुळात गरिबीत असलेले ही कुटुंबे आपले मूळचे मातीचे असलेले घर चिऱ्यांचे बांधू शकले नव्हते. पण आता जेव्हा यांचे घर कोसळल्याने चिऱ्यांच्या घर उभारण्याशिवाय पर्याय नाही. अशा परिस्थितीत यांना 1 लाख रुपयांची मदत काय कामाची? त्यामुळे त्यांनी अजून पर्यत घर बांधणीला सुरुवात केली नसल्याने उत्तम गावडे यांनी सांगितले. दुसरे म्हणजे या दोन भावांची दोन वेगवेगळी कुटुंबे एकाच घरात वेगवेगळी राहायचे. यांच्या घरांना एकच घर क्रमांक असल्याने एकाच घराची नोंद झाली आहे.

बोणकेवाडा वांते येथे झोपडी उभारून राहणारे पूरग्रस्त कुटुंब
बोणकेवाडा वांते येथे झोपडी उभारून राहणारे पूरग्रस्त कुटुंबDainik Gomantak
Goa : बोणकेवाडा वांते येथे उभारलेली झोपडी
Goa: विठ्ठलापूर-साखळी पुलाजवळील रस्त्याचे काम पुन्हा एकदा सुरु

मदतीची आश्वासने विरली हवेत

दरम्यान या कुटुंबाला नवीन घर उभारून देऊ असे आश्वासन स्थानिक राज्यकर्त्याने दिले होते. पण त्याचा आता काही पत्ताच नसल्याने आता करावे असा त्यांच्यासमोर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे त्यामुळे त्यांना नेत्यांनी दिलेली आश्वासने हवेत विरल्याची दिसून येते.

झोपडीत हलवला आसरा

दरम्यान यांची घर कोसळल्याने आपल्या आसरा शेजारील घरांमध्ये हलवला होता. आणि तिथूनच आपल्या जीवनाचा गाढा हाकायचे. गणेश चतुर्थीत यांनी आपल्या कोसळलेल्या घराची माती बाजूला सारून आणि साफ सफाई करून पडलेल्या घराच्या जागेवर झोपडी उभारली आणि गणेश चतुर्थी साजरी केली. दरम्यान दीड दिवस गणेशोत्सव साजरा करताना सर्व मंडळी या उभारलेल्या झोपडीत राहायला आली आहे. सद्य ही मंडळी दिवसभर नवीन उभारलेल्या झोपडीत राहतात तर रात्रीच्या वेळी शेजारी झोपायला जातात.

यासंबंधी पांडुरंग गावडे यांनी सांगितले की, आमच्या कठीण काळात शेजाऱ्यांनी आम्हाला आसरा दिला, आधार दिला. त्यांचे आमच्यावर मोठे उपकार आहे. गणेश चतुर्थी नंतर आम्ही आता पूर्वीच्या ठिकाणी झोपडी उभारून राहायला सुरुवात केली आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com