Goa Flood: पंचायत महिला शक्ती अभियानतर्फे पूरग्रस्तांना कडधान्य वाटप

दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसाच्या अतिवृष्टीवेळी (Heavy Rain) वाळवंटी नदीचे पाणी बाहेर फुटून नदीकाठच्या काजीवाडा-विठ्ठलापूर भागाला पुराचा तडाखा बसला होता.
Member of Panchayat Mahila Shakti Abhiyan
Member of Panchayat Mahila Shakti AbhiyanDainik Gomantak

डिचोली: पुराचा तडाखा बसलेल्या कारापूर पंचायत क्षेत्रातील काजीवाडा-विठ्ठलापूर येथील पूरग्रस्तांना तातडीची मदत म्हणून उत्तर गोवा पंचायत महिला शक्ती अभियानतर्फे कडधान्य देण्यात आले आहे. रविवारी मयेचे आमदार प्रवीण झांट्ये यांच्या हस्ते पूरग्रस्तांना कडधान्याचे वाटप करण्यात आले. (Flood victims were helped By Panchayat Mahila Shakti Abhiyan in Goa)

दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसाच्या अतिवृष्टीवेळी वाळवंटी नदीचे पाणी बाहेर फुटून नदीकाठच्या काजीवाडा-विठ्ठलापूर भागाला पुराचा तडाखा बसला होता. काही घरांनी पाणी घुसून अन्नधान्य आदी सामानाची नाशाडी झाली. त्यामुळे विशेष करून गरीब कुटुंबांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे.

Member of Panchayat Mahila Shakti Abhiyan
Goa Flood: छत निवारा गेला आता जगायाचे कसे ?

त्याची दखल घेत महिला शक्ती अभियानतर्फे ही तातडीची मदत केली आहे. कडधान्य वाटपावेळी गोवा पंचायत महिला शक्ती अभियानची अध्यक्ष उन्नती सहस्त्रबुद्धे, उपाध्यक्ष तथा कारापूरची पंच सुषमा सावंत, उत्तर गोवा जिल्हा पंचायतीची माजी अध्यक्ष अंकिता न्हावेलकर, कारापूर-सर्वणचे मावळते सरपंच गोकुळदास सावंत, उपसरपंच दामोदर गुरव, पंच लक्ष्मण गुरव, मये भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष सीताराम सावंत आदी उवस्थित होते. कडधान्य हातात पडताच पूरग्रस्तांनी समाधान व्यक्त केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com