'वेस्टर्न बायपासच्या कामावर देखरेख ठेवण्यासाठी फ्लाइंग स्क्वॉडची नियुक्ती करणार'

"या कामामुळे या भागातील लोकांना त्रास होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ." असे ते म्हणाले.
'वेस्टर्न बायपासच्या कामावर देखरेख ठेवण्यासाठी फ्लाइंग स्क्वॉडची नियुक्ती करणार'
Deepak Pauskar & Vijay SardesaiDainik Gomantak

मडगाव: सार्वजनिक बांधकाम मंत्री दीपक पाउसकर (Deepak Pauskar) यांनी गुरुवारी फातोर्डाचे (Fatorda) आमदार विजय सरदेसाई (Vijay Sardesai) यांच्या सोबत पश्चिम बायपासच्या सुरू असलेल्या कामाची पाहणी केली व या कामामुळे पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण होणार नाही याची सर्व काळजी आपला विभाग घेईल, तसेच या कामावर लक्ष ठेवण्यासाठी फ्लाईंग स्कॉडची नियुक्तीही करणार असल्याचे सांगितले. या महिन्याच्या सुरुवातीला फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी मुंगुल, माडेल आणि फातोर्डाच्या शेजारील भागातील रहिवाशांसह पश्चिम बायपास प्रकल्पासाठी होत असलेल्या सखल भागात जमिनीचा भराव थांबवला होता. घाऊक मासळी बाजाराजवळ हे काम सुरू होते. हे काम पूर्ण होण्यासाठी सुमारे एक वर्षाचा कालावधी लागणार असल्याचे पाउसकर यांनी सांगितले. "या कामामुळे या भागातील लोकांना त्रास होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ." असे ते म्हणाले. या पूरग्रस्त भागात स्टिल्ट्सवर बायपास बांधण्यासाठी आपण मागणी करत आहोत, असे सरदेसाई म्हणाले आणि न्यायालय ते मान्य करेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

"आम्ही स्टिल्ट्सवर 980 मीटर बायपासची मागणी केली आहे, सरकारने आमची मागणी मान्य केली आहे आणि आता न्यायालयानेही ही मागणी मान्य करावी अशी आमची अपेक्षा आहे." असे सरदेसाई म्हणाले. ते म्हणाले की, सखल भागात पश्चिम बायपासच्या बांधकामामुळे लोकांना त्रास होऊ नये. “आम्ही वेस्टर्न बायपासच्या विरोधात नाही. हे व्हायला हवे, परंतु येथे राहणाऱ्या लोकांना त्याचा त्रास होता कामा नये.” असे ते म्हणाले.

Deepak Pauskar & Vijay Sardesai
मुरगाव बंदर खाजगीकरणाच्या सावटाखाली !

सरदेसाई म्हणाले की, हे काम पूर्ण होण्यास काही महिने लागतील, त्यामुळे पावसाळ्यात पूर येऊ नयेत यासाठी पावले उचलली पाहिजेत. "सरकारने या भागात फ्लाईंग स्कॉडची नियुक्ती करावी, अशी माझी मागणी आहे, त्यामुळे या भागावर सतत लक्ष ठेवले जाईल." असे सरदेसाई म्हणाले. “सुमारे 980 मीटरचा एलिव्हेटेड बायपास बांधण्यासाठी मी राष्ट्रीय हरीत लवाद, जलस्रोत आणि PWD सार्वजनिक बांधकाम खात्याच्या पॅनेलच्या सूचनांचे स्वागत करतो. पण ते प्रत्यक्षात यायला हवे.” असे सरदेसाई म्हणाले.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com