
पणजी: देशभर वाढत असलेल्या कोरोनाबाधितांच्या संख्येबरोबर राज्यातील कोरोनाबाधितांची संख्याही झपाट्याने वाढत असून आज अधिकच्या उपचारासाठी 7 रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, तर संक्रमण दर (पॉझिटिव्हिटी रेट) 11.20 टक्क्यांवर पोहोचला आहे.
(Follow the rules regarding corona statement by Minister vishwajeet Rane)
सध्याची परिस्थिती गंभीर बनत असल्याने कोरोनासंबंधीच्या सर्व नियमांचे पालन करावे, असे आवाहन आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी केले आहे.
राज्यात आज कोरोनाचे नवे 78 रुग्ण सापडले असून संक्रमणाचा दर 11.20 टक्के इतका झाला आहे, तर सक्रिय रुग्णांची संख्या आता सातशेच्यावर जावून 761 झाली आहे. राज्यात आतापर्यंत 2 लाख 47 हजार 229 नागरिकांना कोरोनाची बाधा झाली असून यापैकी 2 लाख 42 हजार 665 रुग्ण बरे झाले.
हे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.14 टक्के इतके आहे. गेल्या 24 तासांत कोरोनामुळे कुणाचाही मृत्यू झाला नसल्याने मृत्यूचा आकडा 3 हजार 833आहे. काल दिवसभर 696 संशयित रुग्णांच्या चाचण्या घेतल्या, त्यापैकी 78 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.