राष्ट्रपतींच्या सल्ल्याचे पालन करुन मुख्यमंत्र्यांनी तीन रेषीय प्रकल्प रद्द करावेत - युरी आलेमाव

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भारतातील पर्यावरण, जंगल, वन्यजीव यांच्या संरक्षणासाठी पावले उचलण्याची गरज
Yuri Alemao
Yuri AlemaoDainik Gomantak

मडगाव: भारताच्या नूतन राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू (President Draupadi Murmu) यांनी आपल्या पहिल्या भाषणात निसर्गाचा आदर करण्यावर आणि वन आणि पर्यावरणाचे रक्षण करण्यावर भर दिला हे स्वागतार्ह आहे. त्यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित असलेले गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Dr. Pramod Sawant) यांनी त्यांच्या सल्ल्याचे पालन करावे आणि तीन रेषीय प्रकल्प रद्द करण्यासाठी तातडीने पावले उचलावीत अशी मागणी कुंकळ्ळीचे आमदार आणि काँग्रेसचे कार्याध्यक्ष युरी आलेमाव (MLA Yuri Alemao) यांनी केली आहे.

मी भारताच्या नवीन राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांचे अभिनंदन करतो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भारतातील पर्यावरण, जंगल, वन्यजीव यांच्या संरक्षणासाठी (Wildlife Conservation) पावले उचलण्याची गरज आहे. विनाशकारी प्रकल्प उभारण्यासाठी आज भाजप सरकार (BJP Government) पर्यावरण नष्ट करुन जमिनी क्रोनी कॅपिटलिस्टच्या (Crony Capitalist) ताब्यात देत आहे असे युरी आलेमाव म्हणाले.

भारताच्या राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू ह्या गोव्याची मातृस्वरूप आहेत. त्यांची नाळ नेहमीच निसर्गाशी जोडली गेली आहे. गोवा हे नैसर्गिक सौंदर्यासाठी ओळखले जाते (Goa known for natural beauty). गोवा सरकारने त्यांचे अनुभवाचे बोल ऐकले पाहिजेत असे युरी आलेमाव म्हणाले.

Yuri Alemao
दुचाकीला वाचवण्याच्या नादात दोन कदंब बस धडकल्या

राष्ट्रपती पदाची शपथ घेतल्यानंतर आज आपल्या भाषणात, "हजारो वर्षांपासून, माझी जमात निसर्गाशी एकरूपतेने जगत आहे. मला माझ्या जीवनात जंगले आणि जलस्रोतांचे महत्त्व कळले आहे. निसर्गापासून संसाधने घेणे आणि तिची समान आदराने सेवा करणे हे परस्पर फायदेशीर आहे" असे उद्गार श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी काढल्याचे युरी आलेमाव यांनी सांगितले व त्यांच्या शब्दांचा आदर करणे आपले कर्तव्य असल्याचे ते म्हणाले.

गोवा सरकारने त्यांच्या भाषणातुन बोध घेवुन तीन रेषीय प्रकल्पांमधून होणारा पर्यावरण, जंगल, वन्यजीवांचा नाश थांबवण्यासाठी सक्रिय पावले उचलण्याची वेळ आली आहे. सदर प्रकल्प रद्द करणे ही गोव्यातील या सुंदर भूमीची नेहमीम निसर्गाची पूजा करणाऱ्या राष्ट्रपतीना मानवंदना ठरेल असे युरी आलेमाव म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com