सांगोल्‍डा येथील ‘फूड बँक फॉर पुअर’तर्फे अन्नदान

माणुसकीचा हात उपक्रमाला प्रतिसाद; 4 हजार कामगारांना जेवण
सांगोल्‍डा येथील ‘फूड बँक फॉर पुअर’तर्फे अन्नदान
Food plate Dainik Gomantak

पणजी: सांगोल्‍डा येथील फूड बँक फॉर पुअर या संस्‍थेने रविवारी कामगार दिनानिमित्त हॉटेल नवतारा यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने कामगारांसाठी अन्नदान हा उपक्रम राबवला. (food distribution program at Sangolda Goa)

Food plate
चोडण बेटावर दिवसाआड पाणीपुरवठा; लोकांचे हाल

संस्‍थेने पणजी, म्‍हापसा, मडगाव, कळंगुट आदी ठिकाणच्‍या सुमारे 4 हजार 400 कामगारांना अन्नदान केले, अशी माहिती संस्‍थेचे विश्‍वस्‍त डोनाल्‍ड फर्नांडिस यांनी दिली. याबाबत आम्‍ही दानशूर लोकांना एका ताटासाठी 40 रुपये देणगी देण्याचे आवाहन केले होते. यासाठी नवतारा हॉटेलमध्ये फूड बँक कूपन ठेवली होती. याला गोमंतकीयांनी चांगला प्रतिसाद दिला. याबद्दल लोकांचे आभार, अशी कृतज्ञता त्‍यांनी व्‍यक्‍त केली.

हॉटेल नवतारा ग्रुपने साधारणपणे जेवण केवळ 50 रुपयांत देऊन आपले सामाजिक उत्तरदायित्व पार पाडले. यासाठी ‍संस्‍थेचे 29 कार्यकर्ते सकाळपासून दुपारपर्यंत कार्यरत होते, अशी माहितीही फर्नांडिस यांनी दिली. दरम्‍यान, विविध ठिकाणच्‍या कामगारांनी फूड बँकेच्‍या या उपक्रमाविषयी समाधान व्‍यक्‍त केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.