Football Pro-League| फुटबॉल निवडणूक 30 ऑक्टोबरला; जीएफए समितीचा निर्णय

प्रो-लीग स्पर्धा 3 ऑक्टोबरपासून नियोजित
Goa Pro-League football
Goa Pro-League football Dainik Gomantak

पणजी: गोवा फुटबॉल असोसिएशनची (जीएफए) कार्यकारी समिती निवडणूक 30 ऑक्टोबरला होईल. यासंबंधी निर्णय सध्याच्या समितीच्या बैठकीत घेण्यात आला. प्रो-लीग स्पर्धा 3 ऑक्टोबरपासून घेण्याचे ठरले. जीएफए कार्यकारी समितीची मागील निवडणूक ऑक्टोबर 2018 मध्ये झाली होती. सध्याच्या समितीचा कार्यकाळ पुढील महिन्यात संपत आहे.

(Football election on October 30; Decision of GFA Committee in goa)

Goa Pro-League football
Johnson's Baby Powder Licence| महाराष्ट्र एफडीएने जॉन्सन बेबी पावडरचा परवाना केला रद्द!

मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने आदेश दिल्यानंतर सत्तर वर्षे वयोमर्यादा ओलांडलेले चर्चिल आलेमाव यांनी यापूर्वीच अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर अँथनी पांगो यांनी अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली.

जीएफए समितीच्या बैठकीनंतर सदस्य जोनाथन डिसोझा यांनी सांगितले, की आम्ही ३० ऑक्टोबरला निवडणूक घेण्याचे निश्चित केले आहे. निवडणूक पणजीत होईल. संबंधित प्रक्रिया हाताळण्यासाठी निवडणूक अधिकारी नियुक्त करण्यात येईल. संबंधित पदाची नियुक्ती सोमवार अथवा मंगळवारपर्यंत होईल.

Goa Pro-League football
Goa Tourism: हॉटेलमालकांना पर्यटकांची माहिती देणे बंधनकारक!

प्रो-लीग स्पर्धा घेणार

वारंवार लांबणीवर पडलेली गोवा प्रोफेशनल लीग स्पर्धा तीन ऑक्टोबरपासून घेण्याचे कार्यकारी समितीने निश्चित केले आहे. पदावनतीसंदर्भात यूथ क्लब ऑफ मनोरा संघाने लवादाकडे दाद मागितली आहे. त्यामुळे प्रतीक्षा आहे. निर्णय झाल्यानंतर स्पर्धेतील सहभागी संघांबाबत निर्णय होईल. मनोरा संघाच्या बाजूने निर्णय झाल्यास स्पर्धेत 12 संघ खेळतील अथवा 11 संघ असतील, अशी माहितीही बैठकीनंतर जोनाथन यांनी दिली.

तीन रेफरींना मदतनिधी

जीएफएतर्फे दरवर्षी मदतनिधी सामना घेण्यात येतो. त्याद्वारे उभा होणारा निधी गरजू फुटबॉलपटू, अथवा फुटबॉल संबंधितांना दिला जातो. गेली दोन वर्षे मदतनिधीचे वितरण झाले नव्हे. यंदा एकूण तीन माजी फुटबॉल रेफरींच्या कुटुंबीयांना देण्याचे जीएफएने ठरविले आहे. त्यानुसार माजी रेफरी कालिदास देसाई, इनासियो रॉड्रिग्ज व आर्मांद रॉड्रिग्ज यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 25 हजार रुपयांचा धनादेश दिला जाईल, अशी माहिती जोनाथन यांनी पुरविली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com