पिळगाव येथील पायवाट असुरक्षित

कडा लागल्या कोसळू: आतापर्यंत गेला दोघांचा जीव
पिळगाव येथील पायवाट असुरक्षित
पिळगाव येथील पायवाट असुरक्षितDainik Gomantak

डिचोली: सारमानसहून पिळगावला जोडणारी पायवाट दिवसेंदिवस असुरक्षित बनली आहे. या पायवाटेच्या कामाची निविदा मंजूर झाली असून, 93.93 लाख रुपये खर्चून वाटेचे काम करण्याचा प्रस्ताव आहे. परंतु सध्या या पायवाटेच्या कामास सुरवात न झाल्याने पायवाटेची कडा (धड) कोसळू लागल्या आहेत.

‘पोंय’ (मानस) काठी असलेली ही पायवाट कमकुवत बनली असून, गेल्या वर्षी पुराच्या तडाख्यात ही पायवाट धूपून गेली आहे. अधूनमधून या पायवाटेच्या धडेची पडझड होत आहे.

पिळगाव येथील पायवाट असुरक्षित
'बैलपार नदीकाठच्या मातीचा भराव उचला'

पिळगाव पंचायत क्षेत्रात येणारी ही पायवाट सारमानस, मुड्डीवाडा, नार्वे भागातील नागरिकांसाठी उपयोगी पडते. या पायवाटेच्या एका बाजूने ‘पोंय’ आहे. मात्र, पोंयच्या काठी पायवाटेला कोणतेही संरक्षण नसल्याने दरवर्षी पावसाळ्यात या पायवाटेची धडा कोसळत आहे.

सारमानस रस्त्याला जोडून असलेली ही पायवाट मुड्डीवाड्यावरुन पिळगावला जोडलेली आहे. साधारण 800 मीटर अंतराची ही वाट पिळगाव पंचायत क्षेत्रातील जनतेसह नार्वे आदी भागातील जनतेसाठी ये-जा करण्यास सोयीची ठरत आहे.

दोघांचे बळी

आतापर्यंत या पायवाटेमुळे दोघांचे बळी गेले आहेत. पावसाळ्यात नदीचे पाणी वाढले की, ही पायवाट पूर्णपणे पाण्याखाली येते. नंतर मात्र या पायवाटेवरून चालत जाणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखे आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.