Forecast of rain in the state
Forecast of rain in the state

राज्यात पावसाची शक्यता

पणजी : २६ ते २८ ऑक्टोबर दरम्यान राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान गेल्या चोवीस तासांत राज्यात सरासरी कमीत कमी २४. २ अंश सेल्सिअस आणि जास्तीत जास्त ३१.४ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे. सध्या नैऋत्य मान्सूनचे वारे देशातून बाहेर पडण्यासाठीचे वातावरण निर्माण झाले आहे. हे वारे उत्तर महाराष्ट्र आणि संपूर्ण देशातून २८ ऑक्टोबरपर्यंत बाहेर पडण्याची शक्यता आहे.

याच दरम्यान ईशान्य मान्सून दक्षिण भारतात तसेच केरळ, कर्नाटकसारख्या भागात सक्रिय होण्याची शक्यता आहे. गोवा वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार समुद्रावरील वातावरणही आता सामान्य झालेले असून मासेमाऱ्यांना समुद्रात न उतरण्याची दिलेली सूचना मागे घेण्यात आली आहे. आज दिवसभरात राज्यात तुरळक पावसाची नोंद काही ठिकाणी झाली.
 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com