हरमल बेकरीजवळ दुचाकीस्वाराची विदेशी महिलेला धडक

 हरमल बेकरीजवळ दुचाकीस्वाराची विदेशी महिलेला धडक
accident

पेडणे : एका अपघातामुळे व व्हिडीओ रेकॉर्डिंगमुळे पेडणे पोलिसांनी एका दुचाकी चोरट्यास अटक करून गजाआड केले. हरमल येथे काल दुचाकी वाहनाने हरमल बेकरीजवळ एका पादचारी विदेशी महिलेस धडक दिली. अपघात होताच घटनास्थळावर दुचाकी सोडून तो पळाला. हा अपघात 9 जून रोजी घडला होता. त्यासंदर्भात शिबू माणिक (पश्चिम बंगाल) या युवकाला काल अटक केली.(A foreign woman was hit by a two-wheeler near Harmal Bakery)

अपघातावेळी काही स्थानिक व्यक्तींनी दुचाकीस्वाराचा व्हिडिओ शूट केला होता. संशयिताच्या शरीरावरदेखील जखम झाली होती आणि हा व्हिडिओ पेडणे पोलिसांनी पाहिला. या चोरीप्रकरणी पोलिस निरीक्षक जीवबा दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली संशयिताला पकडण्यासाठी पथक तयार केले. यासंदर्भात आरोग्य केंद्रात लक्ष ठेवण्यात आले होते. काल 11 जून रोजी संशयित व्यक्ती जिल्हा रूग्णालय म्हापसा येथे तपासणीसाठी गेला असता पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन आवश्यक उपचार केले. चौकशीदरम्यान मिळालेल्‍या माहितीनुसार आणखी चोरीला गेलेल्या दुचाक्‍या सापडण्याची शक्‍यता आहे. 

पेडणे पोलिस निरीक्षक जीवबा दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रफुल्ल गिरी, रूपेश कोरगावकर, फटी नाईक, महेश नाईक, जीवन गोवेकर यांनी ही कारवाई केली.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com