Goa Tourists : गोव्याच्या स्वच्छतेसाठी सरसावले पर्यटक

हरमल परिसरात रस्त्याच्या बाजूला मोठ्या प्रमाणात कचरा फेकला होता तो काही विदेशी पर्यटकांनी गोळा केला.
Cleaning Campaign
Cleaning CampaignDainik Gomantak

Cleaning Campaign: हरमल परिसरात रस्त्याच्या बाजूला मोठ्या प्रमाणात कचरा फेकला होता तो काही विदेशी पर्यटकांनी गोळा केला. आपल्या आरोग्याची काळजी घेऊन निसर्ग स्वच्छ आणि सुंदर ठेवावा, असा संदेश या विदेशी पर्यटकांनी स्वच्छता उपक्रम राबवून दिला.

तसेच आम्हाला स्वच्छता हवी, मग तुम्हाला ती का नको? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. क्लीन नेचर सेंटर व पार्टी हंट या मोबाईल ॲपद्वारे हा उपक्रम राबविण्यात आला.

शनिवार, 28 रोजी हरमल परिसरात विदेशी पर्यटकांनी रस्त्याच्या बाजूचा कचरा साफ केला. त्यातील काही पर्यटक हे गायक कलाकार होते.

ते या कचरा उचलण्याच्या उपक्रमात सहभागी झाले होते. जे पर्यटक या स्वच्छता मोहिमेमध्ये सहभागी झाले होते त्यांना पूर्ण शाकाहारी जेवणाची सोय केली होती. त्यात फळे, भाजी व पाणी यांचा समावेश होता.

या उपक्रमाविषयी क्लीन नेचर सेंटरच्या संस्थापकांनी सांगितले की, किनारी व इतर भागांत ज्या प्रमाणात पार्ट्या आयोजित केल्या जातात. त्यामुळे अनेक ठिकाणी कचरा असा कचरा गोळा होतो.

हा कचरा होऊ नये यासाठी पार्टी हंट मोबाईल ॲप सुरू केलेला आहे. त्यातूनच पार्टीसंदर्भात ठिकठिकाणी फलक तयार करणे, ते लावणे आणि वेगवेगळ्या जाहिरातींचे कार्ड वितरित करणे यावर नियंत्रण मिळेल.

Cleaning Campaign
Panjim Municipality: ...यामुळे सत्ताधारी नगरसेवकांना प्रश्‍न मांडणेही भीतीचे

मोरजीतही पुढाकार

गावागावांतील कचरा गोळा करण्यासाठी सरकार प्रत्येक पंचायतीला खास निधी देते. गावांतील रस्त्यावरील कचरा किंवा घराघरांतील कचरा त्या-त्या पंचायती उचलतात. मात्र, किनारी भागातील कचरा कोण उचलणार, अशी स्थिती असतानाच मोरजी किनारी भागातील कचरा गोळा करण्यासाठी विदेशी पर्यटकांनी पुढाकार घेतला आहे.

आम्ही दरवर्षी या सुंदर किनारी पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी येतो. यंदा मोठ्या प्रमाणात किनारी भागात कचरा साचलेला आहे. शिवाय रस्त्याच्या बाजूला कचरा फेकण्याचे प्रकार वाढत आहेत. गावातील प्रत्येकांनी आपली जबाबदारी समजून कचऱ्याची विल्हेवाट लावावी. - टिटो अलेक्झांडर, रशियन नागरिक

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com