घरचा रस्ता न धरता परप्रांतीय पदेर करताहेत पाव विक्री

pavvale
pavvale
फोंडा : टाळेबंदीच्या काळात विविध राज्यातील मजुरांनी आपल्या घरचा रस्ता धरला असून त्यात परप्रांतीय पदेर कामगार आपल्या व्यवसायासाठी थांबले आहेत. फोंडा शहराबरोबच ग्रामीण भागात विविध ठिकाणावर सकाळी व संध्याकाळच्या दरम्यान रस्त्याकडेला थांबून पावाची विक्री करताना दिसून येत आहेत.
फोंडा तालुक्‍याच्या ग्रामीण भागात टाळेबंदीमुळे हातावर मोजता येतील इतकेच परप्रांतीय पदेर राहिले आहेत.
'पूर्वीचे ते पदेर ही गेले आणि ते पाव' ही गेले अशी म्हण आहे. स्थानिक पदेरांची संख्या कमी झाली आहे. राज्यात गेल्या कित्येक वर्षांपासून शहराबरोबर ग्रामीण भागात परप्रांतीय पदेरांनी जाळेच विणले असून परप्रांतीयांनी पाव बनवणाऱ्या भट्ट्या भाडेपट्टीत घेऊन हा व्यवसाय करीत आहेत. याच व्यवसायावर परप्रांतीय पदेर कामगार आपला उदरनिर्वाह चालवत असून गेल्या कित्येक वर्षांपासून राज्यात परप्रांतीय पदेरांची संख्या झपाट्याने वाढली होती. टाळेबंदीच्या काळात परप्रांतीय काही पदेरांनी घरवापसी केली असून मोजकेच पदेर व्यावसायिक आपल्या कामासाठी थांबले आहेत.
पूर्वी पदेर पहाटे सायकलवरून प्रवास करत पावाची विक्री करत होते. पण आता चित्र बदलताना दिसत असून रस्त्याकडेला सायकल थांबवून किंवा दुचाकीचा वापर करीत पावाची विक्री करताना दिसत आहेत. पूर्वीच्या पदेरांचा पाव व आताच्या परप्रांतीय पदेरांचा पावात तफावत दिसून येत आहे.  
 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com