दक्षिण गोव्यात बेडकांना वाचविण्यासाठी वन खात्याची खास गस्ती पथके

frogs.jpg
frogs.jpg

मडगाव: गोव्यात (goa) विशेषतः सासष्टीत (Salcete) बेडकांचे (frogs) मास मोठ्या चवीने खाल्ले जाते त्यामुळे पावसाळ्यात हे शिकारी रात्रीच्या वेळी बेडूक पकडायला जात असतात. अशा शिकाऱ्यावर नियंत्रण आणण्यासाठी सध्या वन खात्याने (Forest Department) 5 भरारी पथके (Squads) नेमली असून 20 कर्मचाऱ्यांना फक्त याच कामावर नियुक्त केले आहे.पर्यावरण संतुलनासाठी बेडूक हा महत्वाचा घटक आहे. पण गोव्यात काही जण आपल्या जिभेचे चोचले पुरविण्यासाठी याच बेडकांच्या जीवावर उठत आहेत. दक्षिण गोव्यात बेडकांचे मास 'जम्पिंग चिकन' (Jumping Chicken) म्हणून प्रसिद्ध आहे.(Forest Department Special Patrol Squads to rescue frogs in South Goa)

पावसाळ्यात काही हॉटेल्स मधूनही बेकायदेशीर रित्या हे मास विकले जाते.यासंदर्भात माहिती देताना दक्षिण गोव्याचे उपवनपाल (Forester)  अनिल शेटगावकर यांनी सांगितले, कायद्याने बेडकांची शिकार करण्यावर बंदी असून अशा शिकाऱ्यांवर नियंत्रण आणण्यासाठी आमची खास भरारी पथके सासष्टी आणि केपे भागात कार्यान्वित करण्यात आली असून त्यांच्यासाठी 5 वाहनांची तजवीज केल्याचे त्यांनी सांगितले.यंदा पाऊस तसा कमी असल्याने बेडकांच्या शिकारी अजून झालेल्या नाहीत. मात्र मागच्या वर्षी असे काही प्रकार उघडकीस आले होते असे शेटगावकर यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com