Santosh Raiturkar passed away: मडगावचे माजी नगराध्यक्ष संतोष पै रायतूरकर यांचे निधन

1988 ते 1991 या कालावधीसाठी त्यांनी या पालिकेचे नगराध्यक्षपद भूषविले.
Santosh Raiturkar
Santosh RaiturkarDainik Gomantak

Santosh Pai Raiturkar passed away: मडगावचे माजी नगराध्यक्ष आणि मडगाव येथील समजिक क्षेत्रात कार्यरत असलेले संतोष पै रायतूरकर (73) यांचे आज (12 एप्रिल) सकाळी 11 च्या सुमारास ह्रदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.

(Former Chairperson of Margao Municipal Council Santosh Pai Raiturkar passed away )

संतोष रायतूरकर यांच्या पश्चात त्यांची पत्नी दुर्गा आणि पुत्र अमोघ तसेच भाऊ असा परीवार असून आजच त्यांच्या पार्थिवावर मडगाव स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनावर विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी दुःख व्यक्त केले असून त्यांच्या आत्म्याला सद्गती प्राप्त होवो अशी प्रार्थना केली आहे.

काँग्रेस पक्षातून आपल्या राजकीय कार्याला सुरुवात केलेले रायतूरकर हे 1985 साली पहिल्यांदा काँग्रेस गटातून मडगाव पालिकेवर नगरसेवक म्हणून निवडून आले. 1988 ते 1991 या कालावधीसाठी त्यांनी या पालिकेचे नगराध्यक्षपद भूषविले.

Santosh Raiturkar
Tejas Express: मुंबई-गोवा प्रवासाची रंगत वाढणार, तेजस एक्स्प्रेसला मिळणार दुसरा विस्टाडोम कोच

त्यानंतर आणखी एकदा ते पाजीफोंड प्रभागातून नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यांनी मडगाव मतदारसंघांतून दोन वेळा विधानसभा निवडणूकही लढविली मात्र दोन्हीं वेळा त्यांना त्यात यश आले नाही.

शांत स्वभावाचे व्यक्तिमत्त्व म्हणून ओळख असलेले रायतूरकर हे मडगाव शहरातील सामजिक कार्यातही सक्रीय होते. मडगाव अँब्युलन्स ट्रस्ट, मडगाव सेवा संघटना या माध्यमातून त्यांनी बरेच कार्य केले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com