"स्व. मनोहर पर्रीकर यांना बदनाम करण्याचा प्रयत्न"

दैनिक गोमन्तक
गुरुवार, 3 डिसेंबर 2020

मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करीत आहेत का?

पणजी: मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करीत आहेत का? अशी विचारणा आम आदमी पक्षाचे राज्य निमंत्रक राहुल म्हांबरे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केली.

"स्व. मनोहर पर्रीकर यांनी दुहेरी मार्गाला कधीही आक्षेप घेतला नव्हता" या मुख्यमंत्र्यांच्या ताज्या विधानाचा उल्लेख करून ते म्हणाले, नेहमीच लोकांना फसवले जाऊ शकत नाही, याची जाणीव मुख्यमंत्र्यांना नसावी.

पर्रीकर यांची चित्रफीत पाहिल्यास दिसते, की पर्रीकर यांनी लोहमार्ग दुपदरीकरणास विरोध केला होता व कोळसा हाताळणीस एमपीटी प्रोत्साहन देते, असा आरोपही केला होता. सरकार लोहमार्ग दुपदरीकरणास मान्यता देणार नाही, असे पर्रीकर म्हणाले होते. या संदर्भात चित्रफितही विविध ग्रुपवर फिरत आहे. त्याबदद्लही जनतेच चर्चा आहेे.

आणखी वाचा:

संबंधित बातम्या