Goa: प्रदेश काँग्रेसच्या निवडणूक कार्यालयाचे माजी मुख्यमंत्र्यांनी केले उद्घाटन

गोवा प्रदेश काँग्रेसच्या (Goa Pradesh Congress) निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन आज माजी मुख्यमंत्री व आमदार प्रतापसिंह राणे यांच्या हस्ते आज झाले.
Goa: प्रदेश काँग्रेसच्या निवडणूक कार्यालयाचे माजी मुख्यमंत्र्यांनी केले उद्घाटन
Former Chief Minister Pratap Singh RaneDainik Gomantak

पणजी: गोवा प्रदेश काँग्रेसच्या (Goa Pradesh Congress) निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन आज माजी मुख्यमंत्री व आमदार प्रतापसिंह राणे यांच्या हस्ते आज झाले हे निवडणूक कार्यालय पाटो पणजी येथील सेझा घोर इमारतीच्या तळमजल्यावर सुरू करण्यात आले आहे या कार्यालयातून आगामी निवडणूक प्रचाराचे कामकाज सुरू राहणार आहे

Former Chief Minister Pratap Singh Rane
Goa Election: अमित शहा, देवेंद्र फडणवीस ठरविणार गोव्यात भाजपची रणनिती

या कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना माजी केंद्रीय मंत्री व काँग्रेसचे गोव्याचे वरिष्ठ निवडणूक निरीक्षक पी चिदंबरम (P. Chidambaram) म्हणाले की गोव्यातील आगामी सरकार हे गोमतकियांचेच असेल यामध्ये गोव्यातील सर्व घटक क्षेत्रातील लोकांना समावेश केले जाईल लोकांना गोव्यात बदल हवा आहे व तो काँग्रेस पक्षात देऊ शकेल असे मत त्यांनी यावेळी मांडले. दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर आज नवमी असल्याने शस्त्रांची पूजा केली जाते त्यामुळे आज काँग्रेसचे निवडणूक कार्यालय हे एक आगामी निवडणुकीसाठी शस्त्रच असेल असे मनोगत माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांनी व्यक्त केली.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com