गोव्याचे माजी मंत्री सोमनाथ जुवारकर यांचे कोरोनाने निधन  

somnath juvarkar.jpg
somnath juvarkar.jpg

गोवा :  राज्यात कोरोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे.  यात सर्वसामान्य नागरिकांपासून ते मोठमोठ्या लोकांनाही कोरोनाने आपल्या विळख्यात घेतल्याचे आपण पाहत आहोत. अशातच, गोव्याचे माजी मंत्री सोमनाथ जुवारकर यांचे कोरोनाने निधन झाले. ते ७४ वर्षांचे होते. कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यानच त्यांचे निधन झाले.  (Former Goa minister Somnath Juwarkar dies in Corona)

सोमनाथ जुवारकर यांनी 1989 ते  2002 या काळात पणजी जवळील तलाईगाव विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व केले. त्यांनी कॉंग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढविली आणि विजय मिळविला. प्रतापसिंह राणे आणि फ्रान्सिस्को सार्डीना यांच्या नेतृत्त्वात असलेल्या सरकारमध्ये जुवारकर यांनी नागरी पुरवठा, सहकार आणि परिवहन मंत्री म्हणून काम पाहिले.  गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी ट्विट करून जुवारकर यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले आहे. 'गोव्याचे माजी कॅबिनेट मंत्री श्री. सोमनाथ जुवारकर यांच्या निधनामुळे अत्यंत दु: ख झाले. देव त्यांना हे दु: ख सहन करण्याचे सामर्थ्य देईल.' असे ट्विट प्रमोद सावंत यांनी केले आहे. 

दरम्यान, राज्यात कोरोनाच्या वाढत्या आकडेवारीमुळे चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे.गेल्या चोवीस तासात  17  कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला तर 1502  रुग्ण कोरोना बाधित सापडले आहेत. कालच्यापेक्षा आज कोरोना रुग्णांची संख्या कमी असली तरी आज सलग दुसऱ्या दिवशी कोरोना बाधित रुग्णांची संख्या दीड हजार पार झाली आहे. तर आजपर्यंत 943 जणांचे मृत्यू झाले आहेत. त्यामुळे जर हे प्रमाण असेच सुरू राहिल्यास येत्या काही दिवसांमध्ये हजाराचा टप्पा पार होण्यास वेळ लागणार नाही. दरम्यान, राज्यात सध्या 9300  लोक कोरोना सक्रिय आहेत. उत्तर गोव्यातील कोविड उपचार केंद्रात 105  तर दक्षिण गोवा कोविड उपचार केंद्रात 50  कोरोना बाधित उपचार घेत आहेत.  

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com