गोव्याच्या माजी राज्यपाल मृदुला सिन्हा यांचे निधन

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 18 नोव्हेंबर 2020

त्यांचा जन्म २७ नोव्हेंबर १९४२ रोजी बिहारमधील छप्रा येथे झाला होता.सिन्हा या गोव्याच्या २०१४  ते २०१९ दरम्यान राज्यपाल होत्या.

पणजी- गोव्याच्या माजी राज्यपाल मृदुला सिन्हा (७८) यांचे आज बिहारमध्ये वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांचा जन्म २७ नोव्हेंबर १९४२ रोजी बिहारमधील छप्रा येथे झाला होता.सिन्हा या गोव्याच्या २०१४  ते २०१९ दरम्यान राज्यपाल होत्या.

त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शोक व्यक्त करतानाच त्यांनी समाजाच्या तळागाळातील जनतेसाठी कार्य केले आणि त्या आपल्याला आईसमान होत्या असे शोकसंदेशात नमूद केले आहे. सिन्हा या गोव्याच्या पहिल्या पूर्णवेळ महिल्या राज्यपाल होत्या. त्या हिंदीतील प्रतिथयश साहित्यिक होत्या. राज्यपालपदी येण्याअगोदर त्या भारतीय जनता महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष होत्या.

केंद्रीय समाजकल्याण मंडळाच्याही त्या अध्यक्ष होत्या. जयप्रकाश नारायण यांच्या समग्र क्रांती आंदोलनात त्या सहभागी झाल्या होत्या. मानशास्त्रात त्यांनी पदव्युत्तर पदवी घेतली होती. त्यानंतर शिक्षणशास्रातील पदवीही त्यांनी संपादन केली होती. त्यांचा विवाह डॉ. रामकृपाल सिन्हा यांच्याशी झाला ते आधी महाविद्यालयातील व्याख्याते होते त्यानंतर ते मंत्री झाले. सिन्हा यांनी ४६ पुस्तके लिहिली आहेत.

संबंधित बातम्या