तब्बल सहा वेळा केपे पालिकेवर निवडून आलेले माजी नगराध्यक्ष मानुएल कुलासो यांचे निधन

तब्बल सहा वेळा केपे पालिकेवर निवडून आलेले माजी नगराध्यक्ष मानुएल कुलासो यांचे निधन
Manuel Kulaso

मडगाव: केपेतील(Quepem) स्थानिक राजकारणातील(politician) दिग्गज म्हणून ओळख असलेले आणि तब्बल 6 वेळा केपे(Quepem council) पालिकेवर निवडून आलेले माजी नगराध्यक्ष मानुएल कुलासो(Manuel Culaso) (65) यांचे आज सकाळी निधन झाले. मागचे काही दिवस त्यांची प्रकृती बरी नव्हती. दोन दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती अधिकच खालावल्याने त्यांना मडगाव येथील एका खासगी इस्पितळात दाखल केले होते. तिथे उपचार चालू असतानाच त्यांचे निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी आणि पुत्र असा परिवार असून उद्या केपे येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

कुलासो यांना निष्ठावान काँग्रेसमन म्हणून ओळखले जायचे तरी 2012 च्या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसशी बंडखोरी करून युगोडेपाच्या उमेदवारीवर केपेतून निवडणूक लढवली होती. त्यानंतर ते परत काँग्रेस मध्ये आले होते. सध्या ते काँग्रेसचे केपेचे गट अध्यक्ष होते. 

यापूर्वी एकही पालिका निवडणूक न हरलेले कुलासो हे  तीनवेळा नगराध्यक्ष बनले. यंदाच्या पालिका निवडणुकीत मात्र त्यांना निसटता पराभव स्वीकारावा लागला होता. या निवडणूकीचा प्रचार चालू असतानाच त्यांची प्रकृती खालावू लागली होती. त्यामुळे निवडणूक प्रराचारावर ते अधिक भर देऊ शकले नव्हते. तांच्या निधनावर अनेकांनी दुःख व्यक्त केले.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com